|| हरि ॐ ||
क्षणात आले नभी मेघ कृष्ण हे,
रंग छटांनी बदलले निर्झर !
उतरले अवनीवर घन:शामी कोण हे,
बदलत्या विविध आकृत्यांनी झरझर !
बरसू लागले श्याम मेघ ते
अवखळ झाल्या सरीता साऱ्या !
समुद्रही झाला वेडापिसा,
झोके घेती फेसाळ लाटा किनाऱ्या !
मेघ अलिंगती लता-वेलीते,
आळवत आपली प्रेमगीते !
सुरु लपंडाव आडोश्याने,
स्वरमधुर वारा-पाऊस नृत्याने !
युगल प्रेमी वेडेपिसे होऊन,
नाचती धुंद होऊन हाती हात घेऊन, !
फुलपाखरे ही भिरभिर फिरती,
विविध रंगी फुलांवरून ती !
आवाज टपोर्या थेंबांचा, लालचुटूक कौलांतून,
घेण्या कवेत पागोळ्या, मौज मुलांना त्याहून !
क्षणात पागोळ्यांच्या नद्या अंगणांत,
सज्ज होडया कागदांच्या विहार करण्यात्यांत !
बिचारी पिल्ले ओलीचिंब कुडकुडती घरट्यांत,
पंख पसरुनी पिल्लांना उबदेण्या धडपडते पक्षीण !
नाही त्याला दयामाया दररोज भिजवी घरटे तिचे,
बरसता वाकुल्या दावी गडगडाटे होता धोण !
सर्वत्र पसरला मातीचा सुगंध,
बळीराजा आनंदाने गाई गीत धुंद !
पेरणीची लगबग हातात असे औत,
भगवंताचे अभंग सदोदित मुखात !
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply