विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असताना
कसे सुंदर होईल घरटे, रंगवित होते कल्पना
खिडकीवरल्या कपारीमध्ये, शोधला होता एक निवारा
निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या, आणीत होते काडीकचरा
उजाडता कुणी खिडकी उघडे, चिमण्या बांधीत घरटी
सांज समयी बंद झापडे, ठेवीत त्यांना बाह्य एकटे
नित्य दिनीच्या प्रात: समयी, कुणीतरी फेकी कचरा समजूनी
चिमण्या बांधीत घरटे पूनरपी, दिवसभरीचे कष्ट करूनी
किती काळ हे असे चालले, गेल्या थकूनी चिमण्या दोघी
परि विचार सूचला नाही त्यांना, प्रयत्न करावा इतर जागी
मार्गदर्शक कुणीही नव्हता, जेंव्हां बांधीत होते घरटी
अविचाराने देह झीजवला, राहूनी गेल्या सदैव कष्टी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply