आज रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या आत्यंतिक वापरामुळे, आपल्या खाण्यात येणारी फळे नैसर्गिक पद्धतीने पिकविली असतील याची शाश्वती देता येत नाही. जर ती आपल्या परसबागेत पिकवून वापरता आली तर त्या फळाच्या शतप्रतिशत शुद्धतेबाबत आपल्याला विश्वास असतो.
पाश्चात्य उपचारपद्धतीला अवास्तव महत्व दिल्याने भारतीय जीवनशैलीचे विस्मरण होत गेले. आहार विहाराबाबत ऋतुमानानुसार घ्यावयाची काळजी नगण्य वाटायला लागली. सुश्रुत सहिंतेतील सुत्रांप्रमाणे कितीतरी सूत्रे आवळ्याच्या उपयोगाबाबत संस्कृत साहित्यात लिहून ठेवलेले आहेत.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply