उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी…१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले….२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले…३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply