नवीन लेखन...

वजन कमी करताना तुम्ही या चुका टाळा

हल्लीच्या धावपळीच्या काळामध्ये वजन वाढणं ही समस्या आता सामान्य झाली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जवळ जवळ प्रत्येकजण आपलं वजन कमी करण्यासाठी जमेल ते प्रयत्न करत असताना आपल्याला रोजच आढळून येतात. कुणी डाएट करतं, कुणी जिमला जातं , कुणी केवळ फळं खाण्यावर भर देतात तर कुणी आणखी काही वेगवेगळे प्रकार करतात. पण एवढे प्रयत्न करुनही अनेकांना वजन कमी करण्यात यश येताना काही अडचणी निर्माण होतात. आपण सर्वजण हे तर चांगलेच जाणून आहोत की वजन वाढल्याने केवळ आपण जाड दिसतो असे नाही तर याने वेगवेगळ्या आजारांचा सामनाही आपल्याला भविष्यात करावा लागू शकतो.
Related image
वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न सतत करीतच असते. काही लोक दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण जो उपाय समोरच्या व्यक्तीला लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो तोच आपल्यालाही लागू पडेल असे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तुमच्या शरीरानुसार तुमचे वजन कमी करण्याचा पर्याय निवडला नाही तर तुम्हाला त्याचे भविष्यात काही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करत असाल तर तुम्हाला वजन कमी करणं जास्त कठीण जाऊ शकतं, ते कसं हे आता आपण नीट जाणून घेऊयात.
जेवण बंद करणं
बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की, जेवण करणे बंद केल्याने त्यांचं वजन लगेच कमी होण्यास खूपच मदत होईल. पण असं काहीही नसून अशा प्रकारे जेवण बंद केल्याने कालांतराने तुम्हाला शारीरिक कमजोरी येऊ शकते. असे केल्याने साहजिकच आपल्या शरीराचे मेटाबॉलिजम कमी होत जाते, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यासही मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे वजन कमी करताना एक गोष्ट कायम लक्षात असुद्या आणि ती म्हणजे आपले जेवण बंद करण्याऐवजी हेल्दी आहार घेण्यावर जास्तीत जास्त भर द्या.
फॅट फ्री डाएट
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी केवळ फॅट फ्री डाएटवर अवलंबून राहतात. पण मग अशा प्रकारच्या आहारात कोणत्याही प्रकारची चव राहत नाही ज्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक प्रमाणात बळावते. हेल्दी फॅटचं सेवन न केल्याने तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो ज्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या कामकाजावर होऊ शकतो.
केवळ ज्यूस डाएट
केवळ ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असणाऱ्या प्रोटीनची गरज भागणार नाही. दिवसभर केवळ ज्यूस प्यायल्याने तुम्हाला हलकं तर वाटेल, याने तुम्हाला वजन कमी करण्यास देखील मदत होते, पण यातून तुमच्या शरीराला प्रोटीनची आवश्यक मात्रा मिळणार नाही. अशा प्रकारच्या फक्त ज्यूस डाएटने तुम्ही केवळ तुमच्या मसल्स कमी करु शकता, पण फॅट नाही.
तासंतास वर्कआउट
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती म्हणजे जास्त वर्कआउट केल्याने तुम्हाला अधिक भूक लागते. तुम्ही जितका जास्त वेळ व्यायाम कराल तितकी जास्त तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न करायला त्याची मदतच होईल. जास्त वर्कआउट केल्याने साहजिकच तुम्हाला जास्त भूक लागेल आणि तुम्ही जास्त खाल. अशावेळेस जास्त आहारामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण तर येईलच सोबतच तुमची वर्कआउटची मेहनतही वाया जाईल. म्हणूनच तुमच्या वर्कआउटची एक ठराविक वेळ आणि तुम्ही कितीवेळ तो करणार आहात ते आधीच  ठरावा.
— संकेत प्रसादे 
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..