नवीन लेखन...

अवतार मेहेरबाबा

मेहेरबाबा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८९४ रोजी पुणे येथे झाला.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर मेहेरबाबा हे अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले. शिर्डीचे साईबाबा, शिर्डीजवळील साकुरीचे उपासनी महाराज, पुण्याचे हजरत बाबाजान, नागपूरचे ताजुद्दीन बाबा, दौंड जवळील केडगांव बेटचे नारायण महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. सर्व जातीधर्मातील लोकांना मानवतेचा संदेश देत पुढे त्यांनी जगभर प्रवास केला.

१९२३ मध्ये बाबा नगरला प्रथम आले. ‘मेहरबाबा जगात फिरले पण त्यांनी नगरची भूमी निवडली व येथेच स्थिरावले. ते नगरजवळील वांबोरी रोडवरील पिंपळगाव माळवी येथील आश्रमात राहात असत. त्यांची समाधी अरणगाव येथे मेहेरबाद येथे आहे व या ठिकाणी भाविक दर्शनासाठी व शांतीसाठी राज्यातून, भारतातून व जगातून येत असतात. त्यांच्या अरणगाव (मेहेराबाद) येथील कुटीवर सर्व धर्माचे प्रतीक म्हणून सात रंगाचा ध्वज लावण्यात आला. याच ठिकाणी त्यांनी १९२५ ला धर्मार्थ दवाखाना व मोफत शाळा सुरू केली.

बाबांनी १० जुलै १९२५ ते शेवटपर्यंत म्हणजे ३१ जानेवारी १९६९ असे ४४ वर्षे मौनव्रत पाळले. या काळात ते कोणाशीही बोलले नाही. यादरम्यान त्यांनी भारतात अनेक ठिकाणी व १३ वेळा अध्यात्म प्रचारासाठी जगप्रवास केला. त्यांनी ‘गॉडस स्पिक’,’लिसन ह्युमिनिटी’, ‘परफेक्ट मास्तर’, ‘अवतार’ आदी ग्रंथ लिहिले.

३१ जानेवारी १९६९ रोजी नगर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव माळवी तलावाजवळ असलेल्या मेहेराझाद इथं मेहेरबाबांचं देहावसान झाले. त्यांचं पार्थिव मेहेराबादला आणून इथं त्यांची समाधी बांधण्यात आली. समाधी मंदिरावर मंदिर, मशीद, क्रूस व अग्निपात्राची प्रतिकृती आहे. जणू सर्व धर्माचं संचित इथे आहे! आतील भिंती व घुमटाच्या आत मेहेरबाबा व भक्तांची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. समाधी मंदिराचा लाकडी उंबरठा ओलांडला की, समोर दिसतं मेहेरबाबांचं स्मितहास्य करणारं तैलचित्र. समाधीवरच्या संगमरवरी शिळेवर लिहिलं आहे- ‘मी शिकवण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आलो आहे!’ इथं मौन पाळलं जातं. बाहेर आल्यावर प्रसाद घेताना ‘जय बाबा’ हे दोन शब्द सोडले, तर निरव शांततेचा अनुभव इथे येतो. रोज सकाळी व संध्याकाळी ७ वाजता मेहेरप्रेमी इथं जमतात. कुणाच्या हातात गिटार, तर कुणाकडे ढोलकी असते. संगीताच्या तालावर विविध भाषेतील प्रार्थना ऐकताना आपणही तल्लीन होऊन जातो.

मेहेरबाबांची बहिण मनिजा व अन्य काही व्यक्तींच्या समाधी जवळच आहेत. शेजारी असलेल्या वडाच्या झाडाखाली काही श्वानांच्या समाधी आहेत. मेहेरबाबांचं पशू-पक्ष्यांवर खूप प्रेम होतं. सतत समवेत असणाऱ्या श्वानांची सोबत त्यांनी कायम राखली आहे. मेहेरबाबा ज्या पत्र्याच्या खोलीत रहात ती खोली अजून जपून ठेवण्यात आली आहे. मेहेरबाबांची जयंती (२५ फेब्रुवारी) व अमरतिथीला (३१ जानेवारी) तिथं मोठा शामियाना उभारला जातो. उत्सवकाळात हा सगळा डोंगर भक्तांनी भरून जातो. जगभरातील मेहेरप्रेमी तेव्हा इथे येतात. इथं आल्यावर पडेल ते काम ही मंडळी आनंदानं करतात. कुणी झाडू घेऊन साफसफाई करतो, तर कोणी रंगकामाची जबाबदारी हौसेनं उचलतो. ‘सेवेतच प्रभुत्व’ हे मेहेरबाबांचं सांगणं ही मंडळी प्रत्यक्षात आचरणात आणतात. मेहेराबादला वर्षभर भाविक येत असतात. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था इथं आहे. टेकडीच्या दुसऱ्या टोकाला भव्य भक्तनिवास उभारण्यात आला आहे. ही देखणी इमारत, तेथील तैलचित्रं, तसंच कुष्टरोग्याला मेहेरबाबा आंघोळ घालत असल्याचं संगमरवरी शिल्प आवर्जून पाहावं असं आहे. उत्सवकाळात सुमारे ४० हजार भाविकांची चोख व्यवस्था केली जाते. देश-परदेशांतील काहींनी तर या परिसरातच घरं बांधून कायमचं वास्तव्य केलं आहे.

ट्रस्टच्या माध्यमातून मेहेराबादच्या टेकडीवर मोठय़ा प्रमाणात वनीकरण करण्यात आलं आहे. वनराईमुळे ससे, मुंगूस, हरणं यासारखे प्राणी इथे दिसतात. जवळच असलेल्या तलावावर अनेक प्रकारचे पक्षी येतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..