मनहृदयी! अव्यक्त गूढ जीवनाचे
तडजोड! जीवनात आव्हान आहे।
सत्य! केवळ मनांतरी साक्ष बिलोरी
जगणे सुखानंदी, संचिती दान आहे!
ध्यास जीवाला जगावे मनासारखे
प्रारब्धाचे, भोग भोगणे भाळी आहे।
जगणे अवघड, तारेवरची कसरत
हवे ते कां ? कधीतरी गवसले आहे।
जीवाजीवांचीच, अंतरी खंत बोचरी
क्षण! दुःख,वेदनांचे कर्मफल आहे।
जन्म! जे लाभले तेच भोगण्यासाठी
तडजोड! जीवनात आव्हान आहे।
जगणे! वास्तवी खेळ कठपुतळीचा
दोर! अनामिकाच्याच हातात आहे।
जीवन! म्हणजे वास्तवी पराधीनता
तडजोड! जीवनात आव्हान आहे।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना:-क्र. १५६.
१८ – १२ – २०२१.
Leave a Reply