प्रश्न अनुत्तरीत सदा या जीवनी..
लाभली कां ? जीवा सत्यप्रीती..
मनप्रीता अंतरीची ही निश्ब्दुली..
मी कधीच शब्दात मांडली नाही..।।..१
असलीस जरी तू , दूर कितीही..
तुज मी , कधीच विसरलो नाही..
पाळलीही सुचिता , संस्कारांची..
विरहाची वाच्यताही केली नाही..।।..२
नाते मनहृदयी , सोज्वळ प्रीतीचे..
न उच्छृंखली भोगवादी भावनांचे..
प्रीतीस ! मानुनीया दान संचिताचे..
सत्यता , मी कधी विसरलो नाही..।।..३
वाहती समांतर सरीतेचे किनारे..
असुनीया संगती , वंचित मिलना..
मधुनी वाहते , निरंतर प्रीतीगंगा..
सुख हे सात्विक , मना खंत नाही..।।..४
अंती मिलन , अथांग महासागरी..
हे अव्यक्त सत्य शुचिर्भूत जीवनी..
मानीता दान कृपाळू दयाघनाचे..
हृदयी आज याचना उरली नाही..।।..५
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
766544908
रचना क्र. ५८ / २७ – ४ – २०२१
Leave a Reply