नवीन लेखन...

विडा घ्या हो नारायणा – भाग २

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ८३ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४०

विडा हा एवढा औषधी गुणधर्माचा आहे, की हा जर कोणी खात असेल तर त्याला अन्य कोणते रोग होण्याचा चान्सच नाही. वेगळे व्हिटामिन्स नकोत, कॅल्शियम नको, पाचक नको, वेगळे रक्तशोधक नको, वेगळे अस्थिपोषक नको, वेगळ्या औषधाची गरजच नाही. विडा हेच स्वयम एक औषध आहे. फक्त त्याची खाण्याची एक पद्धत आहे.

विड्याचे पान म्हणजे आयुर्वेदीय ग्रंथात वर्णन केलेली नागवेल. पचनानंतर उष्ण गुण वाढवणारी अर्थात, कफ आणि वात दोष कमी करणारी आहे. म्हणजेच कफ आणि वात या दोषामुळे निर्माण होणाऱ्या, गळा, नाक, कान, घसा, स्वरयंत्र, छाती, फुफ्फुसे, कंठ या भागातील चिकट कफाला सोडवून बाहेर काढण्यासाठी या पानाचा उपयोग होतो. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, किरकोळ ताप अंगदुखी, डोकेदुखी, भूक न लागणे आदि लक्षणे असलेल्या त्रासासाठी नागवेलीचे हे पान उत्तम औषध आहे. चवीला तिखट असणारे हे पान स्वतःच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळे आमाशयातील कफ काढून टाकायला मदत करते. पचन सुधारतेच, शिवाय मलमूत्रातील चिकटपणा लगेचच कमी करते.

आजच्या भाषेत सांगायचे तर त्यात भरपूर फायबर असल्याने पोटामधे भरपूर चोथा जातो, ज्यामुळे पोट साफ राहायला मदत होते.

असे औषधी पान प्रत्येक देवकार्यामधे मानाचे स्थान मिळवून आहे. देवाच्या नैवेद्यानंतर देवानीसुद्धा खावे, एवढे औषधी असलेले पान ही भारतदेशाची ओळख म्हटलं तरी चालेल.

खुल जाए बंद अकल का ताला, म्हणजे ह्रदयातील कोलेस्टेरॉलप्रमाणे मेंदुवर असलेल्या मंदबुध्दीचे शेवाळ कमी करणारे हे पान जणुकाही अनेक रोगांच्या कुलुपाची चावीच आहे.

अनेक औषधी गुणधर्माच्या या बनारसवाला पानाला डाॅनमधील अमिताभने आपल्या नृत्याने प्रसिद्ध करून ठेवले होते.
या पानाला, आता मात्र जिन्याखाली, भिंतीवर, एसटीमध्ये खिडकीच्या खाली, जिकडे तिकडे रंगीत पिचकाऱ्या मारून, विनाकारण बदनाम करून टाकले आहे.

जे पान पोटात जायला हवे ते कॅन्सर होण्याच्या अवास्तव भीतीपोटी, पोटात न जाता, ओठातून बाहेर पडून भिंती सारवू लागले आहे. यात पानाचा दोष नक्कीच नाही. ब्राझीलहून आलेला आणि भारतातील पानात जाऊन बसलेला, आम्हाला नको असलेला तो तंबाखू, पान मात्र बदनाम करून गेला. गुन्हा एकानं करायचा आणि शिक्षा मात्र दुसऱ्यालाच असे काहीसे या पानाच्या बाबतीत झाले आहे. हे मात्र नक्कीच!!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
03.07.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..