नवीन लेखन...

विडा घ्या हो नारायणा – भाग ९

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९० ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४७

तर सांगायचे काय होते, बडिशेप लवंग वेलची भाजून वापरू नये. भाजल्यास दळ जातो, औषधी गुण कमी होतात, म्हणून हे पाचक पदार्थ असेच कच्चे खावेत.

व्यवहारात बडिशेपेला सैंधव मीठ लावून भाजून ठेवतात, कारण ती मऊ होऊ नये यासाठी. न भाजता वापरली तर मुलांना ती जरा तिखट, किंचित कडवट लागते, भाजली तर या मसाल्यांचा उग्रपणा, तिखटपणा, तीक्ष्णपणा थोडा कमी होतो, लहान मुलांना चव पण आवडते, म्हणून भाजून त्यात मीठ साखर वगैरे घालतात. मुलांसाठी ठीक आहे. पण मोठ्यांनी न भाजताच वापरावी.

एक लक्षात ठेवावे, पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !

पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही.

तोंडातील पान चावून चावून हळूहळू गिळून संपले तरी जीभेचा व्यायाम काही थांबत नाही. सहजपणे ती इकडेतिकडे फिरत राहाते. कुठे काही शिल्लक राहिले आहे का याचा सीआयडी प्रमाणे शोध घेत असते. जिथे दातांच्या फटीत, एखाद्या छिद्रात, पानावशेष किंवा अन्नावशेष शिल्लक असेल तर तुमचे दुसरे तिसरे काम करत असताना देखील जीभ आत स्वस्थ बसत नाही, ती आपली स्वच्छता मोहीम तिथेही सुरूच ठेवते. दाताच्या फटीत अडकलेला सूक्ष्म केस देखील जीभ शोधून काढते. एवढी जीभ आजच्या भाषेत ‘सेन्सेटीव्ह’ आहे. आणि दात हिरड्या, इ भाग स्वच्छ ठेवणे हाच जीभेसाठी उत्तम व्यायाम असतो.

जीभेवर असणाऱ्या सर्व टेस्टबडस् (म्हणजे चव समजून सांगणाऱ्या ग्रंथी,) या लवंग वेलची आणि बडिशेप या मिश्रणामुळे अधिक कार्यरत होतात.

वेलचीमुळे मुखदुर्गंधी कमी होते. वेलचीचे काम अगदी मेंदूपासून ह्रदयापर्यंत होते. आतड्यातील चिकटपणा देखील वेलची कमी करते. वैद्यांच्या रोजीरोटीमधील एक महत्त्वाचे औषध म्हणजे सीतोपलादि चूर्ण. यामधे वेलचीच्या दाण्यांची पूड वापरलेली असते. कफ सुटण्यासाठी ही वेलची या औषधामधे वापरली जाते.

लवंग आवाज सुटण्यासाठी चघळावी. ती उत्तम पित्तशामक आहे. नुसती तोंडात ठेवून तयार होणारी लाळ गिळली तरी आवाज मोकळा होत जातो. जीभेला त्यातील तेल लागल्यावर थोडी चुरचुर निर्माण होते आणि लाळ उत्पन्न होऊ लागते. स्वरयंत्रापर्यंत चिकटलेला कफ सहजपणे सुटतो. साधी सर्दी झाली असली तरी एखादी लवंग चघळीत राहाण्याने छान आराम मिळतो. या कफामुळे पोटात अडकलेले पित्त काही वेळा आपले काम नीट करू शकत नाही. या अडकलेल्या पित्ताला सोडवण्यासाठी लवंग उपयोगी ठरते.

आयुर्वेदीय ग्रंथात वर्णन केलेले अविपत्तिकर चूर्ण हे जणु वैद्यांच्या हातातील पित्तावरील हुकुमी एक्का. या चूर्णातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे लवंग.

अर्थात सीतोपलादी, अविपत्तिकर, ही “औषधे” आहेत. प्रत्येक औषध हे आपल्या वैद्याच्या सल्ल्यानुसारच घ्यावे. त्याची मात्रा, अनुपान, घ्यायची वेळ, हे सर्व आपले “फॅमिली वैद्य” सांगतील.

ही सर्व औषधे जेव्हा पानातून एकत्रित वापरली जातात, तेव्हासुद्धा ती तसाच गुण दाखवतात. एकमेकांना मदत करतात. आतील सर्व अवयवांची काळजी घेतात. एखाद्या “जाॅइन्ट फॅमिलीसारखी”!

पण आपणाला आता जुन्या औषधांवर, या “फॅमिलीवर”, विश्वासच उरलेला नाही. सगळं अगदी रेडीमेड हवं. फॅमिली जोडणारी आजी वृद्धाश्रमात गेली. तिच्याबरोबरचा औषधांचा, अनुभवांचा बटवादेखील हरवला.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
10.07.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..