आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ एक आशयार्थाने तुलना ? बुध्दिबळाचा डाव सुरु होतो तेंव्हा दोघां कडेही सामर्थ सारखेच असतें. जसें जसें एकमेकांकडुन चाली रचल्या जातात त्याप्रमाणे एकमेकांच्या शक्तिचा कस लागतो. या खेळाचे वैशिष्ठ असे कि प्रत्येकास शक्ती दिली आहें पण मर्यादीत. उंट तिरका, हत्ती फक्त आडवा वा सरळ, तर वजीर चहुबाजुने सरळ, प्याद चहुबाजुने सरळ पण एकच घर, घोडा अडीच घर, राजा चहुबाजुने फक्त एकच घर , पुढे सरकु शकतात.
राजा जास्त हलु शकत नाहीं. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वजीर हत्ती उंट, घोडे, प्यादी यांवरच असतें. वजीरा जवळ सर्वात जास्त शक्ति असतें पण बहुतेंक वेळा वजीराचाच मारामारीत बळी जातो. मग इतरांवर राजाच्या संरक्षणाची जबाबदारी पडतें. बुध्दिबळाचे वैशिष्ठ असें कि कोण कधी उपयोगी पडेल हें सांगता येत नाहीं. हे सर्व चालींवर अवलंबुन असतें. मात करताना कोण उपयोगी पडेंल हें पण सांगता येत नाही. कधी कधी साधं प्याद पण मोठी डोके दुखी ठरतें.
अगदी साधं प्यादही मात करताना उपयोगी पडतें. त्यासमोर वजीर व हत्ती पण कधी कधी कुचकामी ठरतात.
बहुतेक हल्ले वजीरावरच प्रथम होतात. पुढे तकलीफ नको म्हणुन एकमेकांचे वजीरही बलिदान देण्याची बुध्दिबळात पध्दत आहें. थोडक्यात बुध्दिबळात जीवनाचे मोठे रहस्य सामावलेले आहें. आपल्या जवळ जें असतें त्यात काहीं कमी नसते. आपण तें कसें वापरतो यावर जीवनाचे भवितव्य ठरतें. आपल्या जवळ जे सामर्थ आहें तें कौशल्याने वापरणें हें बुध्दिबळातील चाली सारखेंच असतें. जीवनातील या चाली बुध्दिबळातील खेळा सारख्याच असतात. पण प्रकार वेगळा.
म्हणुनच बुध्दिबळ खेळाचे मर्म समजुन घ्या आणि जीवनात यशस्वी व्हा ? फक्त चाल करणारे आपलेच सगें सोयरे नाहीत ना ? हें मात्र बघणें आवश्यक आहें. नाहीं तर आयुष्याचा वा जीवनाचा बुध्दिबळच होईल ? स्वतःच्याच जीवनावर मात्र मात होण्याची वेळ येईल ? इति लेखन सीमा,
अनिल भट
Leave a Reply