MENU
नवीन लेखन...

आयुष्याला आकार देताना

लेखक : डॉ. श्रीराम लागू – अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित 


माझे वडील डॉक्टर होते तसेच काँग्रेसचे पुढारीही होते. काही काळ त्यांनी आमदारकीही भूषवली. मीही डॉक्टर होऊन त्यांची जागा घ्यावी आणि आपल्याला शांत मनाने निवृत्त होता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकाची आवड असूनही शाळेत कधी अभिनय केला नाही. पुण्यातील भावे स्कूलमध्ये माझे शिक्षण झाले. त्यावेळी शाळेत आजी आणि माजी विद्यार्थ्यांची नाटके होत. माजी विद्यार्थ्यांमध्ये शरद तळवलकर, सदू शिंदे अशा नामवंत कलाकारांचा समावेश असे. त्याच वेळी आपण असे काही तरी करावे असे प्रकर्षाने वाटे. पण, शाळेत आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्येही कधीच अभिनय केला नाही.

वैद्यकीय महाविद्याल्यात प्रवेश घेतल्यानंतर माऊ रंगभूमीची आवड स्वस्थ बसू देईना. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाची आमची पहिलीच बॅच, त्यावेळी तिथे केवळ ५० विद्यार्थी होते. पहिल्याच वर्षी मी निवडणूक लढवून ‘ड्रामा सेक्रेटरी’ झालो. भालबा केळकरांशी माझी चांगली मैत्री होती. त्यावेळी पुण्यात भालबा केळकरांचे नाव चांगल्न गाजत होते. पुण्यातील जवळजवळ प्रत्येक महाविद्यालयच्छ स्नेहसंमेलनप्रसंगी नाटक बसवण्यासाठी भालबांना बोलवन जाई. नाटक बसवणे ही वेगळी कला असून त्यासाठी नाटकाचे ज्ञान असणे गरजेचे असते तसेच त्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते हे भालबांमुळे समजले. नाही तर चार-पाच मुले एकत्र येऊन स्वत:च नाटक करत असत. भालबांनी त्यात शिस्त आणली.

आम्हीही स्नेहसंमेलनाचे नाटक बसवण्यासाठी भालबांनाच बोलवायचे ठरवले. पहिल्याच वर्षी आम्ही आचार्य अत्रे यांच्या ‘वंदे भारतम्‌’ या नाटकाची निवड केली. मीही त्या नाटकात अभिनय करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत मी रंगमंचावर कधी अभिनय केला नव्हता. परंतु, आपल्याला अभिनय जमू शकेल असा विश्‍वास होता. कारण, काही लोक बाथरुममध्ये गाणी म्हणतात तसे मी बाथरुममध्ये अभिनय करून पहात असे. त्या काळात मी नाटक आणि सिनेमे नियमितपणे पहात असे. त्यातील आवडलेल्या अभिनेत्याचा अभिनय बाथरुममध्ये आवर्जून करत असे. कदाचित त्यामुळेच पहिल्यांदाच रंगमंचावर भूमिका साकारत असूनही माझा अभिनय सर्वांना आवडला. पहिल्या नाटकाच्या प्रयोगानंतर अनेकांनी भेटून माझ्या अभिनयाचे कौतुक केले. त्यावेळी माझा स्वत:वरच विश्‍वास बसत नव्हता. त्या दिवसापासून मला नाटकाचे वेड लागले. खरे तर नाटकाने झपाटले असेच म्हणावे लागेल. आम्ही महाविद्यालयात नाटक करण्याच्या नवनवीन संधी शोधत असू. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी नाटक सादर केले जाई. संधी मिळत नसल्यास आम्ही मुलींना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करायला सांगत असू. या कार्यक्रमाच्या निमित्तानेही नाटक करण्याची संधी साधत असू. मग नाटकासाठी महिना महिना तालमी करण्याचीही सर्वांची तयारी असे. पण या काळात मी सातत्याने उत्तीर्ण होत गेलो म्हणून वडिलांना तक्रार करण्यास संधी मिळाली नाही.

त्या काळी महाराष्ट्र शासन नाटकांच्या स्पर्धा भरवत असे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालये येत असत. महाविद्यालयात असताना आम्ही इंटर कॉलेजिएट ड्रामॅटिक असोसिएशन (इडा) ही संस्था स्थापन केली होती. आमच्या संस्थेनेही या स्पर्धेत भाग घेतला. पहिल्या वर्षी आम्ही वसंत कानेटकरांचे वेड्याचे घर उन्हात’ हे नाटक बसवले. या नाटकातील भूमिकेबद्दल मला पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर पुढील दोन वर्षे मला अभिनयाचे पहिले पारितोषिक मिळत गेले. सलग तीन वर्षे सरकारी स्पर्धेत पारितोषिक मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढला तसेच संपूर्ण राज्यभर माझे नाव झाले. अशा अनेक नाटकांमधून प्रोत्साहन मिळत गेले आणि नाटकाचे वेडही वाढत गेले. पाच वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मात्र मोठी पोकळी निर्माण झाली. नाटक करणे बंद झाल्याने अस्वस्थता वाढली. यावर पर्याय म्हणून मी, भालबा केळकर आणि जयंत धर्माधिकारी या तिघांनी मिळून पीडीए (प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन) ही संस्था सुरू केली. दिवसभर वैद्यकीय व्यवसाय सांभाळायचा आणि संध्याकाळनंतर नाटके बसवायची, तालमी करायच्या आणि नाटकांवर चर्चा करायची असा दिनक्रम सुरू झाला. नाटकाचे वेड कोणालाही स्वस्थ बसू देत नव्हते. या वेडापायी मी अनेक वेळा वडिलांची बोलणी खाल्ली आहेत. एकदा तर घरातून हाकलले जायची वेळ आली होती.

वसंत कानेटकरांचे इथे ओशाळला मृत्यू’ हे माझे पहिले व्यावसायिक नाटक. त्यात मी संभाजीची भूमिका करत असे. या नाटकातील प्रभाकर पणशीकर यांची औरंगजेबाची भूमिका सर्वत्र गाजत होती. सुरुवातीला काशीनाथ घाणेकर संभाजीचे काम करत होते. पण या नाटकात औरंगजेबाची भूमिका अधिक महत्त्वाची असल्यामुळे आणि या नाटकाचे बरेच प्रयोग झाले असल्याने काशीनाथ घाणेकरांनी ते सोडले. त्यानंतर कृष्णकांत या अभिनेत्याने संभाजी साकारला. म्हणजे मी संभाजीची भूमिका साकारणारा तिसरा अभिनेता होतो. वसंतराव कानेटकरांची माझी मैत्री होती. त्यांनीच मला संभाजीच्या भूमिकेबद्दल विचारले. मी व्यावसायिक रंगभूमीवर येण्यासाठी आसूसलो होतो. त्यामुळे माझी अगदी नगण्य भूमिका साकारण्याचीही तयारी होती. त्यामुळे मी त्यांना लगेच होकार दिला.

सिनेमापेक्षा नाटक करणे सोपे असल्याने नाटकावरच माझे खरे प्रेम आहे. नाटक करण्यासाठी केवळ चार पोरे जमवावी लागतात. सिनेमासाठी कॅमेऱ्यापासून तंत्रज्ञांपर्यंत बराच जामानिमा लागतो. १९७० पर्यंत मी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून नाटके करत होतो. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत रुग्णांवर शस्त्रक्रिया करत असे. साडेदहापासून नाटकाच्या तालमी सुरू होत. दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेऊन पाच ते आठ पुन्हा ताराचंद रुग्णालयात जात असे. आठनंतर रात्री उशिरापर्यंत नाटकाच्या तालमी चालत. असा व्यस्त दिनक्रम असे. या काळात हॉलीवूडचे सिनेमेही खूप पाहिले. तेव्हाचा अभिनेता पॉल म्यूनी माझ्यासाठी देवाप्रमाणे होता. रोनाल्ड कोलमन, चार्ल्स क्लॉटर अशा अनेक कलाकारांनी त्यावेळी माझ्यावर गारुड केले होते. १९६५ मध्ये मी आफ्रिकेला गेलो. १९६९ मध्ये परत आलो आणि आल्यावर वैद्यकीय व्यवसाय सोडून पूर्ण वेळ रंगभूमीला द्यायचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तोपर्यंत वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्याकडून विरोध होण्याचा प्रश्‍न नव्हता परंतु आईने मला परोपरीने समजावून सांगितले. अर्थात माझा निर्णय ठाम असल्याचे पाहून तिने या क्षेत्रातील कारकिर्दीसाठी पूर्ण पाठिंबा दिला.

नाटकांमधील माझा अभिनय प्रेक्षकांना आवडत होता. एक चांगला नट म्हणून माझी प्रतिमा निर्माण झाली होती. अशा वेळी शांतारामबापूंनी मला चित्रपटातील भूमिकेसाठी विचारले. मी महाविद्यालयामध्ये चांगळे काम केल्याचेही त्यांनी ऐकले होते. मला सिनेमाचे वावडे नव्हते पण तोपर्यंत सिनेमात अभिनय केला नव्हता. शांतारामबापूंनी मला नायकाची भूमिका देऊ केली. पस्तिशी पार केलेला नायक कसा चालेल असे विचारल्यावर त्यांनी या कथेसाठी असाच नायक हवा असल्याचे सांगितले. हा चित्रपट म्हणजेच ‘पिंजरा’. या चित्रपटात मला निळूभाऊंबरोबर काम करायला मिळाले. निळूभाऊंच्या अभिनयाचा मला खूपच हेवा वाटत असे. ते अत्यंत सहजतेने अभिनय करत असत. त्यांनी साकारलेली एखादी भूमिका आपण कशी साकारू शकू असा प्रश्‍न नेहमी पडत असे. ते खरोखरच ‘पॉवरफुल’ आणि नैसर्गिक अभिनेते होते. त्या काळी त्यांचे ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे नाटक मी अनेक वेळा पाहिले होते. या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून थक्क व्हायला होत असे.

हिंदीमधील सोहराब मोदी तर मराठीतील मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर असे अनेक अभिनेते मला आवडत. पण मी कोणाचीही नक्कल करायचा प्रयत्न केला नाही. मराठीतील यशानंतर मला हिंदी चित्रपटही मिळत गेले. मराठी अभिनेत्यांना हिंदी चिज चांगला मान मिळाला तरी चांगल्या भूमिका मिळत नाहीत याचे कारण म्हणजे मराठी अभिनेते हिंदी भाषेकडे फारसे लक्ष देत नाहर हिंदी बोलतानाही त्यांचे उच्चार मराठीसारखेच वाटतात. शिवाय त्याकाळचे अभिनेते फार्ळे शिक्षित नव्हते. नाटक-चित्रपट करणाऱ्यांना कमी लेखले जाई. पण आता अनेक अभिनेते हिंदीमध्ये चमकत आहेत.

आता मी पूर्णपणे निवृत्त जीवन आहे. सध्या केवळ वाचन सुरू असते. ळण तेवढेच करणे शक्‍य होते. माझी वाचनाचे आवड सर्वांना माहित असल्याने मला सर्कजू पुस्तके भेट देतात. विशेषत: हृदयविकार झटका येऊन गेल्यामुळे मी काम करण्ख्चया विचारही करत नाही. आजच्या पिढीला सरळ द्यायचा म्हटले तर मी कुणाचीही नक्कल ₹: करण्याचाच सल्ला देईन. त्यांनी प्रत्येक भूमिकेचा स्वतंत्रपणे विचार करावा. स्वतः बौद्धिक कुवत आणि ताकद ओळखून त्व स्वातंत्र्य घ्यावे आणि स्वतःची शैली विळाच्र करून त्यात प्राविण्य मिळवावे.

-डॉ. श्रीराम लागू

(SV10)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..