आयुष्यात कधी केव्हा
काही अकल्पित घडतं,
नियतीच्या हातातील सूत्र
अचानक मग बदलतं..
काळ नावाचा घाला
अवचित आयुष्यात येतो,
होत्याचं नव्हतं एका
क्षणात सगळं होतं..
नशीबापुढे माणूसही
हतबल असह्य होतो,
जितकं असेल जीवनात
तितकचं दान पदरी पडतं..
क्षणभंगुर आयुष्य सारं
शाश्वती कसलीच नसते,
आज आहे तर उद्याची
खात्री नक्कीच नसते..
भोग असतात जीवनात
भोगून जायचे असतात,
चार प्रेमळ माणसं भेटता
आयुष्य नौका सहज तरतात..
जीवनच उसन असतं
विधात्याचं पानं असतं,
बोलावणं आलं यम दारी
की हे देवाचं दान असतं..
खांदा द्यायला चार जण तर
अश्रू पुसायला पण हवं असतं,
अंतिम यात्रा किती मोठी मग
माणसाचं मोठेपण त्यात असतं..
कोण कसा जीवनी येतो
हे विधात्याचं गणित असतं,
माणसं जोडावी आपुलकीने प्रेमळ
हे मात्र आपल्या हातात असतं..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply