![P-53994-Ba-Bha-Borkar](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2019/01/P-53994-Ba-Bha-Borkar.jpg)
आंनदयात्री कवी बा भ.बोरकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यातील कुडचडे येथे झाला.
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून वाहे, शुभ पाऱ्यासारखे.
असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी! बाळकृष्ण भगंवत बोरकर उर्फ बा भ. बोरकर.
१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ. बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. मा.बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.
निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, – या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात… किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.
१९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी मा.भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. मा.बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता .भारत सरकारने ‘पद्मकश्री ’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बा भ. बोरकर यांची मा.पु.ल.देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
तव नयनांचे दल हलले ग
आयुष्याची आता
बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
इतुक्या लवकर येई न मरणा
बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
बा. भ. बोरकर यांच्या ‘जपानी रमलाची रात्र’ या कवितेचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले वाचन
Leave a Reply