अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.
मराठीतील काही कवींच्या कवितांची अर्कचित्रे काढण्याचा हा प्रयत्न आहे. या कविता मी त्या त्या कवीच्या शक्य तितक्या वैशिष्ठ्यांसह, त्या त्यांच्याच आहेत असे वाटावे अशा पद्धतीने रचल्या आहेत. या सर्व अत्यंत थोर कवींची क्षमा मागून हा प्रयत्न आपल्यापुढे मांडतो आहे.आपल्याला हा माझा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.
गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचे कौतुक करावे ते कविवर्य बा. भ. बोरकर यांनीच ! हे सौंदर्य उलगडता उलगडता ते एखादी कातर आठवणही त्यातच गुंफून जात असत. त्यामुळे आनंदाबरोबर अनामिक हुरहुरही लागून राही.त्याच बोरकरी वळणाची ही कविता-
“माझ्या गोव्याच्या भूमीत, पडे पाऊस मधाचा “……..
Leave a Reply