अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.
मराठीतील काही कवींच्या कवितांची अर्कचित्रे काढण्याचा हा प्रयत्न आहे. या कविता मी त्या त्या कवीच्या शक्य तितक्या वैशिष्ठ्यांसह, त्या त्यांच्याच आहेत असे वाटावे अशा पद्धतीने रचल्या आहेत. या सर्व अत्यंत थोर कवींची क्षमा मागून हा प्रयत्न आपल्यापुढे मांडतो आहे.आपल्याला हा माझा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.
बा. सी. मर्ढेकर हे जुन्या वळणाने कविता लिहिता लिहिता , पूर्वी कधीच न स्पर्शिलेल्या उपमा, शब्द, कल्पना अगदी सहज योजित असत.थेट इंग्रजी शब्दांची पेरणीसुद्धा अशीच सहजपणे केलेली असे.परंपरागत काव्य वाचकांना जोरदार धक्का बसेल असा हा सारा प्रकार ! त्यांच्या कवितेत दुसऱ्या महायुद्धानंतरचा विनाश, जीवनात आलेली विवशता, यांत्रिकता , वेदना सतत जाणवत राहते.त्यांच्या “पिपात मेले ओल्या उंदीर” या खळबळ माजविणाऱ्या पहिल्यावहिल्या कवितेला यावर्षी चक्क ७० वर्षे पूर्ण झाली….
त्यांच्या या खास शैलीतील ही माझी एक कविता !
“आला पाऊस श्रावण धारा”……
Leave a Reply