नवीन लेखन...

मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर

बाळ कोल्हटकर यांना नऊ अक्षरांचा नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला. बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. मा.बाळ कोल्हटकर यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी “जोहार” हे आपले पहिले नाटक लिहिले.

१९४७ पर्यंत ते रेल्वेत नोकरी करत होते. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. “दुरितांचे तिमिर जावो” या नाटकांचे पंधराशे प्रयोग, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे’ याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर ‘एखाद्यांचे नशीब’ या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.

बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘वेगळं व्हायचंय मला’, अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणाऱ्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘वेगळं व्हायचंय मला’, अशा नाटकांनी तर गर्दीचे विक्रम रचले. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच कोल्हटकरांनी काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. ‘देव दीनाघरी धावला’, ‘सीमेवरून परत जा’, ‘शिवराय कवि भूषण’ ही नाटकेही गाजली.

कोल्हटकर उत्तम कवी होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांत पदेही असत. ‘आई तुझी आठवण येते,’ व ‘निघाले आज तिकडच्या घरी’ ही गाणी नाट्यगृहांत प्रेक्षकांना हमखास रडवीत असत. पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या आवाजातील ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी’ हे प्रेमद्वंद्वगीत अजरामर झाले. कुमार गंधर्वजींच्याच आवाजातील भूपाळी ‘ऊठी ऊठी गोपाळा’ आजही सकाळी ऐकू येते. मा.कोल्हटकरांच्या नाटकांच्या शीर्षकांचे एक वैशिष्टय होते की ‘एखाद्याचं नशीब’, ‘आकाशगंगा’ असा अपवाद सोडला तर त्यांच्या ३१ पैकी बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली.

प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. मा.बाळ कोल्हटकर यांचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..