नवीन लेखन...

बालविवाह ; विकासातील अडथळा

बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य वयाचे देखील कायदे आहेत .वयाचे मुलासाठी एकवीस आणि मुलीचे अठरा वर्षे वय योग्य असते . मुलांमुलींची शारीरिक वाढ या वयात पुर्ण होते असे समजले जाते . शहरी , सुशिक्षीत समाजात,  उच्च वर्गात हे घडतही असेल. ग्रामीण भागात , झोपडपट्टी , अशिक्षीत समाजात , दुर्लक्षित भागात उलट घडत असते .बालविवाह लावला जातो.त्याची वाच्यताही कुठे होत नाही .सारे काही अलबेल आणि गोपनिय असते .शाळेत पाचवी ते दहावी – बारावीपर्यंतच मुलींचे लग्न उरकले जातात. कोणतेही सबळ कारण त्यामागे नसते .त्या लेकराला नीट कळतही नसते .बैठक बसते.लग्न ठरते . बोभाटा होत नाही .सारे काही  चुपचाप . कुणाचं वाटोळं नको म्हणून प्रशासकिय यंत्रणा याकडे रितसर डोळेझाक करते .गावातील कर्तीधर्ती मंडळी मूग गिळून गप्प असते . समाजप्रबोधन करण्याची भाषा ज्या सेवाभावी संस्था करतात. त्यासुद्धा या प्रश्नापर्यंत पोहचू शकत नाही .अशा घटना उघडकीस आल्या की त्या चक्रव्यूहात पालक , कर्मचारी  सापडतात.त्यामुळे ‘ सपादलं तर सपादल ‘ अशी भावना वाढीस लागते . अनेक शिकलेली माणसं बालविवाहाच तोटे समजत  असूनही न समजल्यासारखे करतात आणि शिंगे मोडून वासरात … अशी गत होते .आजकाल संकरित अन्नधान्य यासारख्या इतर कारणांनीदेखील मुले वयात यायची प्रक्रीया लवकरच घडते .त्यामुळे पालक चिंताक्रांत होतो आणि सामाजिक भीतीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे बालविवाहास प्रवृत्त होतो. अमुक एका व्यक्तीने असा बालविवाह केला त्याचे कुठे काय झाले म्हणून आपले काय होणार आहे अशी प्रवृत्ती बळावते .खेळण्याच्या , शिक्षण घेण्याच्या बालवयातच असा आघात बालकांच्या माथी मारला जातो . कित्येक समाजात आता मुलीची वानवा जाणवू लागली आहे . पाशाची आमिष दाखवून सर्रास बालविवाह लावले जातात. मुलगा तीस वर्षाच्या पुढील आणि मुलगी अल्पवयीन ! ही मानसिकता  बदलायला हवी .कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंधाचे  सर्व अधिकार असतात. याची जाणीव असायला हवी .
आता तर मालिका , चित्रपटांतूनदेखील अल्पवयीन बालविवाह दाखविले जातात .प्रेमप्रकरण दाखवितात. एवढेच नाही तर बालनायिकेला आंतरजातीय विवाहाचा  ब्रँड अँबेसिटर बनविण्याची तयारी करताहेत . कला आणि वास्तव यात कुठेतरी गल्लत होते. मुलांच्या कलेचे कौतुक आहे . ते असायला पाहिजे.  दुनिया त्यास डोक्यावर घेते . यातून काय बोध घ्यायचाय तो घ्यावा पण बालविवाह हे समर्थनिय मुळीच नाहीत . कोणतीही शारीरिक , मानसिक परीपक्वता नसताना विवाह लावणे योग्य नाही . लगीनसराईच्या धामधुमीत काही गुपचूप बालविवाह लावून दिले जाता. त्यातून भविष्यातील अनेक जटील समस्या निर्माण होतात.बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जाणीवजागृती , जनजागृती मोठ्या प्रमाणात होणेही तितकेच गरजेचे आहे. पालकाचे प्रबोधन केले पाहिजे .बालविवाहाचे तोटे सर्वसामान्यापर्यंत पोहचले तरच ते विचार करणार आहेत . आजही कितीतरी बालविवाह होत आहेत . यापुढील बालविवाह जरी थांबले तरी सशक्त भारत निर्मीतीसाठी ती मदतच ठरणार आहेत .एकीकडे आपण खूप प्रगती केली असे म्हणतो दुसरीकडे बालविवाहाकडे दुर्लक्ष करतो हे कितपत योग्य आहे . या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत. बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.आवश्यक आहे . काही समजात जातपंचायती  बालविवाहास संमती देतात . तेथे प्रबोधनाची गरज आहे. नाट्य, कला, जनजागरण यातून हे शक्य आहे . समाजहितासाठी प्रशासन , सेवाभावी संस्था , समाजसेवक , सुजान नागरिकांनी  पुढे  यायला  पाहिजे ती काळाची गरज आहे  बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.
विठ्ठल जाधव 
शिरूरकासार (बीड)
मो. ९४२१४४२९९५

लेखकाचे नाव :
विठ्ठल जाधव
लेखकाचा ई-मेल :
vitthalj5@gmail.com

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..