आधार निश्चीन्ततेचा
वटवृक्षाचीच सावली
साथ शाश्वत निर्भयी
सोबत सुखदुःखातली ।।१।।
मूक, करडे आभाळ
सांत्वनी, आधार हात
फक्त निस्वार्थीच दाता
जीवनाला सावरणारा ।।२।।
हाच खरा भगवंत जगी
कृपाळू, कृपावंत सदा
घडविणारा, जगविणारा
पुजावा, भजावा अंतरी ।।३।।
वि. ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८३.
२० – ६ – २०२१.
Leave a Reply