नवीन लेखन...

बाप अन् एस टी स्थानक

माझी बदली नगरला असतांनाची घटना.

साधारणतः १९८९ _९० साली, कामाचा एक भाग म्हणून, आगार, बसस्थानकावर, रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था कशी आहे ही पहाणी करण्यासाठी मी अहमदनगर मध्यवर्ती बसस्थानकावर रात्रफेरी घेत होतो.

रात्री ची १०.३० ते ११.०० वेळ होती, इतक्यात एक तिस पस्तीस वर्षे वयाचा अतिशय उमदा, व्यवस्थित पोषाखात असलेला तरुण, एका म्हातार्‍या ग्रुहस्थाचा हात धरून मुख्य प्रवेशद्वारातुन स्थानकात प्रवेश करीत असल्याचे दिसले. त्या वृध्द ग्रुहस्थाच्या खांद्यावर तरटाची एक वळकटी होती, ती कशीबशी पेलवत ते पायओढतं ओढतं चालत होते. का कोण जाणे, त्या वृध्द आजोबांची मला दया आली. पण ते मुला सोबत कुठेतरी परगावी बसने जात असावेत असे वाटले.

ते दोघेही एव्हाना कुठल्या फलाटावर गेले ते दिसलेच नाहीत. आम्ही ही आमची रात्रफेरी घेण्यासाठी आगाराकडे निघुन गेलो. तीन, चार, स्थानकांना भेटी देऊन, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नगर बसस्थानकावर परत आलो. मला काल रात्रीचे ते आजोबा स्थानकाच्या पायर्‍यांवर बसलेले दिसले. अगदी निर्विकार चेहेराने. इतक्यात मागे कार थांबल्याचा आवाज आला, कालचाच आजोबांच्या सोबत आलेला तरुण घाईघाईत स्थानकावर बसलेल्या म्हातार्‍या आजोबांकडे गेला, व त्यांचा हात धरून जवळजवळ ओढतच कारकडे घेउन गेला. त्यांना कारमध्ये बसवून कार चालवत निघुन गेला.

थोडा वेळ मी बघतच राहिलो. स्थानकाच्या सुरक्षारक्षकाने माझ्या मनांत चाललेली चलबिचल ओळखली असावी. पुढे येउन आदबीने सांगीतले

“सर ते आजोबा रोजच बस स्थानकावर केवळ झोपण्यासाठी येतांत, त्यांचा मुलगा आणुन सोडतो व सकाळ झाली की घेऊन जातो, आम्ही त्या आजोबांना एकदा हाकलून दिले पण ते त्या दिवसी सुलभ मध्ये जाऊन झोपले, तेंव्हा पासुन आमची हिंमत होत नाही त्यांना हाकलून देण्याची,”

सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला…….

(सत्य घटना)

— भास्कर पवार
(आम्ही साहित्यिक)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..