नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे. एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे बाबामहाराज सातारकर यांचे व्यक्तिमत्व बहु आयामी आहे.
बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात. बाबामहाराज सातारकर यांची पुरस्कार यादी खूप मोठी आहे. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. बाबामहाराज सातारकर यांचे संकेतस्थळ www.babamaharajsatarkar.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply