शंभर वर्षे जगा तूम्हीं, काका आमच्यासाठीं
बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं
भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे
तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे
उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले
कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले
आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे
दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे
मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां
रंगवूनी बाबांची भूमिका पूर्ण करां ते आतां
चालू ठेवा मार्गदर्शने, तुम्हीं आपल्या घराण्याची
जोपासण्या शिकवा तुम्ही, जीवनाविषयीं तत्वें त्यांची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply