आज इतक्या वर्षांनंतर डाॅ. बाबासाहेब तळागाळात पोहोचले, रुजले. परंतू शेवटी जे सर्वच मोठ्या माणसांचं होतं तेच बाबासाहेब या देव माणसाचंही झालं..बाबासाहेब एक समाजाचे म्हणून ओळखले जायला लागले. जसं, संत नामदेव शिंपी समाजाचे झाले, संत रोहीदास चर्मकार समाजाचे, फुले माळीसमाजाला दिले गेले..! अशी कित्येक उदाहरणं देता येतील.
परदेशात असं झालेलं दिसत नाही. मार्टीन ल्युथर किंग किंवा नेल्सन मंडेला यांचं नेतृत्व बाबासाहेबांसारखंच एका समाजाला मिळणाऱ्या पशुपेक्षाही हीन वागणूकीच्या विपोधातून पुढं आलं होतं परंतू ते एकदा सिद्ध झाल्यावर तेथील सर्वज समाजांनी त्यांचं नेतृत्व स्विकारलं..
आपल्याकडील जातीव्यवस्थेमुळे या थोर लोकांनी दिलेले विचार कोणीच स्विकारले नाहीत. अगदी हे महात्मे ज्या समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी तरी ते विचार कितपत स्विकारले यात शंकेला वाव आहे. त्यांच्या विचारांचा उल्लेख आणि उदो उदो फक्त जयंत्या-पुण्यतिथ्या व निवडणूकींच्या काळातच केला जातो.. बाबासाहेबांचंही तेच झालं, बाबासाहेब एका समाजाचे झाले आणि तेवढेच त्यांचे समता आणि बंधुत्वाचे विचार मात्र आजही ‘गांवकुसा बाहेर’च राहीले असं मला तिव्रतेनं वाटतं..
-नितीन साळुंखे
Leave a Reply