नवीन लेखन...

प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या.

बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले.

सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. १९६५ पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली.

१९५७ मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. मा.नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..