नवीन लेखन...

जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला

जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .

प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़.

बेबी शकुंतला यांनी यानंतर ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्या सारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले होते. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत.

पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला. बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..