नवीन लेखन...

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करित करित

लक्ष्य तयांचे फूलपाखरू,  फुलाभोवती होते खेळत….१

भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी

शोषीत असता गंध फुलांतील,  चंचल होते नजर ठेवूनी….२

व्याघ्र मावशी मनी  ही राणी,  म्याँव म्याँव म्याँव करित आली

उंदीर मामा दिसत तिजला,  झेप घेण्या टपून बसली…३

शंका येता त्याला किंचीत,  झर् झर् झर् तो बिळात गेला

केवळ चित्त सावध असतां,  प्राण आपले वाचवू शकला…४

निसर्ग देतो कला आगळी,  बचाव करण्या शत्रू पासूनी

सावध असतां जीव जीवाणू,  मारू न शकते त्याला कुणी….५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..