नवीन लेखन...

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे

क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१,

सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात

पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२,

चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी

फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३,

हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य

नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४,

ओबड धोबड बटबटती ते,  रंग पसरवी सारे,

कुणा न कळे आधुनिक कला,  ही फसती ज्याला बिचारे….५,

नाद मधूर हा प्रवाह वाहे,  हृदयस्पर्शी जो असे

जीवंत वाटते काव्य सदैव ते, ज्ञान भरले ज्यात दिसे….६,

अर्थ काय आणि भाव कोणता,  उलघडण्याचे कष्ट पडे

नव काव्याची चाल कशी ही,  वाटते सर्वांना कोडे….७,

जे जे होते सुंदर मौलिक,  दृष्टी आड चालले

सवंगपणा आणि नाविन्यात, आत्मा तोच विसरले…८

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..