हिला नओळखणारी व्यक्ती भारतात तरी सापडणे नाही.आपण हाॅटेल मध्ये गेलो जेवून आटपले की बिल देताना (कदाचित त्याची चुटचुट लागू नये म्हणून असेल)प्रत्येक हाॅटेल मध्ये मुखशुध्दी करिता सुंदर प्लेट मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात (भाजून,साखरेचे रंगीत कवच असणारा,सुवासिक इ)हिला समोर ठेवले जाते.
तर अशी हि सुंदर सुवासीक बडीशेप गरम मसाला बनवताना त्यात देखील वापरली जातेच.शिवाय मुखशुध्दीकरीता देखील उपयुक्त आहेच.तसेच ब-याच घरांमधून काढा बनवताना त्यात देखील हिचा उपयोग केला जातो.त्यामूळे हिचे देखील घरचा वैद्य म्हणून उपयोग ब-याच जणांना माहीत असणार हे नक्की.
बडीशेपेचे लहान क्षूप असते आणी त्याला उगवणारी फळे म्हणजे बडीशेप होय.ह्याची चव गोड,कडू,तिखट अशी मिश्र स्वरूपाची असते.आणी हि गुणाने थंड असते.म्हणूनच ती शरीरातील वात आणी पित्त दोष कमी करते.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)सुज आली असता बडीशेपेचा पोटीस सूज आलेल्या ठिकाणी बांधावा सूज उतरते.
२)वारंवार खोकला येत असल्यास बडीशेप चुर्ण खडीसाखरे सोबत मिसळून खावे आराम पडतो.
३)संडासला आव पडत असल्यास सुंठ व बडीशेप समप्रमाणात घ्यावी व तूपात भाजावी आणी बारीक पूड करून दिवसातून तीन वेळा गरम पाण्यासोबत घ्यावी त्वरित आराम मिळतो.
४)उल्टया होत असल्यास बडीशेप चूर्ण मोरावळयाच्या पाकासोबत चाटावे.
५)लघ्वीला जळजळ होत असेल तर बडीशेपेचा काढा करून घ्यावा.
६)पोटात वारंवार जंत होण्याची सवय असेल व त्यामुळे त्रास होत असेल तर बडीशेप चुर्ण मधात मिसळून सकाळी व रात्री रिकाम्या पोटी घ्यावे .
बडीशेप जास्त खाल्ल्यास संडासला साफ होणार नाही तसेच बडीशेप अतीप्रमाणात खाणा-या व्यकतींच्या शरीरातील धातूंना क्षीणता येते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply