बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय पंच गिरीश नातू यांचा जन्म ८ एप्रिलला पुणे येथे झाला.
बॅडमिंटन ‘टेक्निकल ऑफीशीयल’ च्या बाबतीत पुण्याला स्वयंपूर्ण बनवण्यात गिरीश नातू यांचा सिंहाचा वाटा आहे. नातू यांचे शालेय शिक्षण नु म वी व महाविद्यालयीन शिक्षण बीएमसीसी महाविद्यालयात झाले. व्यवसायाने सी. ए असलेले नातू १९९८ साली प्रथम आंतरराष्ट्रीय पंच झाले. तेव्हा नातू हे भारतातील सगळ्यात वयाने लहान असलेले पहिले आंतरराष्ट्रीय पंच होते. गिरीश नातू यांनी आजपर्यंत जागतिक स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंचांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. ते १९९४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून काम करीत आहेत.
सिंगापूर येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. नातू यांनी लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले होते.
बीजिंग आणि लंडन येथील २००८ आणि २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिक मधे भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. १९९३ साली त्यांनी प्रथम आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम केले. ते २०१८ साला पासून BWF सर्टिफिइड रेफरी म्हणून काम बघत आहेत. या बरोबरच नातू यांनी थॉमस व उबेर चषक विश्व अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ऑल इंग्लंड, सुदिरमन चषक आदी स्पर्धामध्ये पंच म्हणून काम केले आहे.
२०१९ मध्ये गिरीश नातू यांनी प्रतिष्ठीत अशा 10 बीडब्ल्यूएफ रेफरीच्या ऑगस्ट ग्रुप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
गिरीश नातू हे वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन टेक्निकल कमिटीचे सदस्य आहेत. तसेच नातू सध्या कोरियामधील एशियन बॅडमिंटन कन्फेडरेशनचे सर्टिफिकेशन कोर्सचे काम बघत आहेत. सध्या ते पुणे बॅडमिंटन असोसिएशनचे(पीडीएमबीएचे) उपाध्यक्ष आहेत.
गिरीश नातू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply