बघता तुला प्रिया रे ,–
जिवा बेचैनी येते,
कासाविशी होता हृदयी,
आत *मोरपीस* हलते,–!!!
विलक्षण *ओढ* तुझी,
काळजाला किती छळते,
मूर्त माझ्या अंतरीची,
*अढळ अढळ* होतं जाते,–!!!
स्पर्श होता तुझा सख्या,
माझी न मी असते,
बाहूंत तुझ्या विसावण्या,
किती काळ मी तरसते,–!!!
तुझ्यातच सारे *विश्व* माझे,
जगही तोकडे भासे,
तुझ्याचसाठी राजसा,
मन्मनीचा *चकोर* तरसे,–!!!
उषा आणि संध्या,
आपले रंग उधळती,
प्रेम रंगाचाच वर्षाव,
भास्करावरती करिती,–!!!
रात्र येते *चंदेरी* ती ,
जेव्हा जवळ तू असशी,
जिवापाड जाऊन तूही,
प्रीत” माझ्यावर करशी,–!!!
धुंद रात्रीची *मदमस्त* किमया,
प्रेमात नखशिखांत नहाते,
आभाळीची चटोर चांदणी,
*प्रेम–लीलेसाठी* धडपडते’–!!!
©️ हिमगौरी कर्वे
Leave a Reply