बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल.. म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली…
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल.. अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला.. घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते.. आपली ओढणी संभाळत.. “भैया जल्दी दो”.. या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती.. घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला…
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली…
तेवढ्यात तो युवक बोलला.. ” आरे अंजली तु इथे कुठे” भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?”.
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले.. आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला..
.
न राहुन तिने त्या युवकाला विचारल.. “माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे”.
तो युवक हसत बोलला “काय फरक पडतो.. तु आहेस तर कुणाची तरी बहिणच ना”?.
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन निघुन गेला…
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानाने उंचावली….
कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते……….
Indian army
— अनुजा
Leave a Reply