महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी सावरकर यांचा उल्लेख “खरा इतिहास संशोधक” असा केला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य समराला ब्रिटिशांनी सोईस्करपणे शिपायांच बंड असे संबोधून टाकले होते. व आजही शाळेतून तोच इतिहास शिकवला जातो. पण सावरकर इंग्लंडला गेल्यावर त्यांनी या विषयावर संशोधन करायचे ठरवले. त्यांनी के निमेलीस यांचा “सिपॉय म्युनिटी 1875” ह्या ग्रंथाच्या सहाही खंडाचा अभ्यास केला. त्यांना संदर्भ शोधायचे होते. “इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी भरलेले होते. सुदैवाने सावरकरांना याचा अभ्यास करायची परवानगी मिळाली. तिथे तासतास बसून महत्वाची टिपणे काढली. ते पाहून त्या ग्रंथपालला आश्चर्य वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी गुप्त कागदपत्रेसुद्धा सावरकरना अभ्यासायला दिली. याचा उल्लेख त्यांनी “शत्रूच्या शिबिरात “ आत्मचरित्रात केला आहे. आणि त्यांनी १८५७ चे बंड नव्हते तर स्वातंत्र्य समर होते हे सिद्ध केले.
ह्या ग्रंथाची दाहकता ब्रिटिश सरकारला समजली. ह्या पुस्तकाचा भारतात प्रसार झाला, तर अनर्थ होईल म्हणून त्यांनी या पुस्तकावर बंदी आणली. तरीही ते गुप्तपणे छापले गेले. लाला हरदयाल, भगतसिंग, सुभाषबाबू यांनी त्याच्या भारतीय भाषात आवृत्त्या गुप्तपणे काढल्या. मॅडम कामा यांनी फ्रेंच तर सुभाषबाबू यांनी जर्मनीत काढली.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)
Leave a Reply