सावरकर यांनी लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती.
सावरकरना मृत्यूचे भय नव्हते. मृत्यूला आव्हान देत ते राष्टकार्य करत होते. १९४३ मध्ये त्यांना साठ वर्षे झाली त्यावेळेस संमारंभात त्यांना दोन लाख दिले पण त्याचा सावरकर यांना हर्षउन्माद झाला नाही. १९१० सावरकरना अटक झाली. कोठडीत त्यांना मित्र अय्यर भेटायला गेले. तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले.” प्राप्त परिस्थितीचा विचार करता तक्रार करण्यासारखे काही नाही. मला अंदमानात नेले तर माझ्या वडील बंधुचे दर्शन होईल “.
एक महिन्यानंतर सावरकरांना डोंगरीहून भायखळा येथील तुरुंगात नेण्यात आले. तिथेच जॅक्सन हत्या कटातील ज. ना . थत्ते शिक्षा भोगत होते. एका वॉर्डरच्या मदतीने त्यांना सावरकरांशी गुप्त भेट घेता आली. त्यांच्या हाता पायात बेडी होत्या. पण त्यांची निर्भय व प्रसन्न वृत्ती थत्ते अचंबित झाले त्यांनी सावरकरांना झालेल्या शिक्षेचा धिक्कार केला पण त्यावर सावरकर म्हणाले.”चापेकर, धिंगरा, कान्हेरे ,अश्या थोरानी आपले बलिदान दिले त्यांच्या पुढे मी कोण ?” अंदमानला नौका पोहोचली तेव्हा सावरकर म्हणाले “ अंदमान स्वतंत्र हिंदुस्थानचा सिंधुदुर्ग व्हायला योग्य आहे.” सावरकरांवर दु:ख कोसळले, काळेपाणी नशिबी आले तरीही सावरकर प्रत्येक प्रसंगात अविचल राहिले.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)
Leave a Reply