सावरकरांच्या साठीपूर्ती वेळी केसरीच्या अंकात श्री भिडे यांनी “अभिनव भारताचा मेझीनि” असे संबोधले होते.दोघांच्या बाबतीत खूप साम्य होते. इटलीवर ऑस्ट्रियाचे स्वामित्व होते. त्यावेळचे नेते सनदशीर मार्गाने निदर्शन करत होते. मेझीनीच्या लक्षात आले ह्या मार्गाने लढा देता येणार नाही. या साठी क्रांतीच गरजेचे आहे. म्हणून त्यांनी “तरुण इटली” क्रांतिकारी संस्था काढली. सावरकरांनी “अभिनव भारत” हि क्रांतिकारी संस्था काढली. दोघांनीही आपल्या मित्राना देशभक्तीच वळण लावले. दोघांनाही लहानपणी वाचनाचा छंद होता. दोघांनाही एकांतात चिंतानाची सवय होती. इटलीच्या लोकात सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवायची मेझीनीने ठरवले. सावरकर लंडनला गेल्यावर तिथे पाश्चिमात्य वृत्तीने राहणारे भारतीय लोक व विद्यार्थी सावरकर यांच्या संपर्कामुळे क्रांतिकारक बनले (मदनलाल धिंगरा)मेझीनी व सावरकर दोघांनाही स्वदेशी चळवळ तीव्र करावी लागली . क्रांतिशिवाय स्वातंत्र्याला पर्याय नाही ही दोघांनाही उमजले होते. त्यामुळे दोघांनीही गुप्त मंडळे तयार केली होती.
इंग्लंडला जायच्या आधीच सावरकर यांच्यावर मेझीनीचा प्रभाव होता. त्यांच्या लक्षात आले,”अभिनव भारत “ मध्ये जो क्रांतिकारी विचार आपण अवलंब करीत आहोत तेच काम मेझीनीने त्याच्या काळात करत होता. गुप्तपणे शस्त्रास्त्र बनविणे,संघटनेत गुप्त क्रांतिकारकांचा भरणा करायचा योग्य वेळ येताच उठाव करायचा. सावरकर सुद्धा सैन्यातील सैनिकांसाठी गुप्त पत्रके पाठवित.
— रवींद्र वाळिंबे
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई )
Leave a Reply