देशसेवेच व्रत सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षीच शपथेवर घेतले. त्यांची मीमांसा करताना ते सांगतात. ”चापेकरांचे कार्य पुढे कोणीतरी चालवायला हवे मग ते मी का चालवू नये? इतरानाही ते कार्य करावेसे वाटत असे पण काही कारणास्तव ते करू शकत नव्हते मग मीच ते का करू नये?” देशाचा झेंडा पुढे नेता यावा म्हणून क्रांतिकारकांच्या मार्गातील काटे साफ करायला कुणी तरी सेपार्स एंड मायानर्स हवे असतात ते कार्य आपलेच समजून आम्ही पुढे सरसावलो” ठाण्याच्या तुरुंगात तात्यारावाबरोबर त्यांचे धाकटे बंधूही होते त्यांनी पाटीवर एक गुप्त संदेश तात्यारावांना पाठवला. तात्यारावांनी उलट संदेश पाठवला “बाष्पयंत्रात उर्जा मिळण्यासाठी इंधन हवे असते, तर ते आपल्याच शरीराचे इंधन का करू नये क्रांतीकार्यासाठी जाळणे हि सुद्धा कर्तव्य निष्ठा आहे.
अभिनव भारत च्या क्रांतीकारकांना शिकवताना ते म्हणत व्यायाम हेच आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य असंभव आहे तुम्ही तुमचे कर्तव्य करा, देशाला स्वतंत्र करण्यासाठी एक शत्रूचा जरी बळी घेऊन मेलात तरी ते तुमचं कर्तव्य ठरेल. अंदमानच्या पहिल्या भेटीत जेलर बारी म्हणाला “मार्सेलीसला पाळून जाण्याचा प्रयत्न करणारा तूच ना? सावरकर म्हणाले, “ होय” बारी म्हणाला “ तसे का केलंस ?” सावरकर म्हणाले, “त्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून” बारी म्हणाला “त्या त्रासात तूच स्वत: पडलास” सावरकर म्हणाले “त्या त्रासात पडणे हे मला माझे कर्तव्य वाटले व त्यातून सुटणे हेही कर्तव्यच वाटले.” अंदमानात सावरकरांना लक्षात आले थोडा प्रयत्न केला तर आपण संगठन तयार करू शकतो आणि ते करणे आपले कर्तव्य आहे.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई ).
Leave a Reply