सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन. १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी,क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. सावरकर वयाच्या ११ व्या वर्षापासून लिखाण करीत होते. लहानपणाचा काळ यात त्यांनी फटके, पोवाडे,लिहिले. इंगलंड मध्ये “जोसेफ मेझीनी” हा ग्रंथ लिहिला.दूसरा ग्रंथ “सत्तावनचे स्वातंत्र्यसमर“ हा ग्रंथ लिहिताना त्यांनी इंग्लंड मधील अनेक संदर्भ ग्रंथ अभ्यासले आणि या निष्कर्षावर आले की सत्तावनचे बंड हे बंड नव्हते तर ते स्वातंत्र्य समर होते. ब्रिटिशनी त्याला बंडाचे स्वरूप दिले. पुढील ग्रंथ शिखांचा इतिहास पण ब्रिटीशांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी ते हस्तलेखन जप्त केले.
पुढील कालखंड म्हणजे अंदमान मधील बंदिवासात लिहिले काव्य “कमला “ लिहायला कोणतेही साहित्य नव्हते. म्हणून त्यांनी कोठडीतील भिंतीवर खिळे ,काडी, अश्या साहित्याने लिहिले.ते मुखोद्गत केले. रत्नागिरीतील स्थानबद्धतेत गाजलेले पुस्तक “ माझी जन्मठेप” पुस्तक लिहिले. याच काळात विज्ञाननिष्ठ निबंध लिहिले, जे अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे होते. उ:शाप, संन्यस्त खड्ग, उत्तरकरिया, ही नाटके लिहिली. काळे पाणी ही कादंबरी, मोपल्यानच्या बंडावर आधारित मला काय त्याचे ही कादंबरी लिहिली सहा सोनेरी पाने ही १९५३ साली लिहिलेली कादंबरी तर त्यांच्या साहित्यातील सोनेरी पान होते. हिंदुत्व, हिंदुपदपादशाही हे ग्रंथ तसेच अनेक विज्ञाननिष्ठ निबंध, अंधश्रद्धेवर टीका करणारे लेख लिहिले. सावरकरांच्या समग्र साहित्याचा आढावा इतक्या छोट्या लेखात घेणे शक्यच नाही. ते म्हणजे घागरीत सागर मावण्याचा वेडगळ प्रयत्न होईल.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई.)
Leave a Reply