सावरकरांची क्रांतीवृती सर्वश्रुत आहे.वयाच्या केवळ १५व्या वर्षी “मी स्वदेश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून, शत्रूला मारीत मारीत मरेतो झुंजेन“ अशी शपथ घेतली होती. १८५७ला सशस्त्र क्रांतीचा सबंध भारतभर प्रयत्न झाला, पण तो फसला गेला. त्यानंतरची सुशिक्षित पिढी मवाळ होती, जी समाजसुधारणासाठी इंग्रजाकडे अर्ज विनंत्या करीत होती. सावरकरांना सशस्त्र क्रांती करायची होती. त्यांचे म्हणणे होते की लोकमान्य टिळक आम्हाला गुप्त आशीर्वाद देतात ते पुरेसे आहे. आम्ही पुर्र्सर बनून क्रांतीचा मार्ग निष्कंटक करून ठेवतो. मग त्यावरून कितीही सशस्त्र क्रांतीचे सैन्य दौडत येवो. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीसाठी जे जे करायचं ठरवलं होते ते “मित्रमेळा” व “ अभिनव भारत”मध्ये सांगत होते त्या मागील प्रेरणा इटलीतील मेझेनीची होती. गनिमी काव्याने लढा द्यायचा. इटाली, आयर्लंड रशिया यांनी याच मार्गाने स्वातंत्र्य मिळवले होते. त्यासाठी सावरकरांनी मेझेनीच चरित्र वाचून त्यावर पुस्तक लिहिले.
१९०६ला सावरकर लंडनला गेले. त्यावेळी इंग्लंड मध्ये सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी होते. बहुतेक मौज करत पण ते सावरकर यांच्या संपर्कात आल्यावर क्रांतिकार्यात ओढले गेले. सावरकरांनी पत्रके गुप्तपणे छापून घेणे, पुस्तकातून छुप्या पद्धतीने पिस्तुल पाठवणे सुरु केले. सहकार्यांना बॉम्ब बनवण्याची कला शिकण्यास प्रवृत्त केले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सैन्यात भर्ती झालेल्या भारतीयांची पोटभरू अशी अवहेलना होई. पण सावरकर मात्र त्यांच्या बाजूने उभे रहात व प्रोत्साहन देत.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)
Leave a Reply