नवीन लेखन...

बाहुली! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – ३

ते एक खेळण्याचे दुकान होते. काचेच्या शोकेस मध्ये खेळणी मांडून ठेवली होती. त्यात सुंदर बाहुल्या, लाकडी रंगीत घोडे, उंट, खेळातली भांडी अजून काहि काही गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. येणारी लहान मुलंच काय, मोठी माणसं पण पहाण्यात रंगून जात.दुपारची वेळ होती. दुकानात गिऱ्हाईक नव्हते. मालकाने नौकरास जेवण करून घेण्यास सांगितले. त्याचे जेवण झाल्यावर, मालक जेवायला निघून गेला.

एक सहा-सात वर्षाचा मुलगा आणि त्याच्या मागून त्याची तीन-चार वर्षाची लहान बहीण, दुकानाच्या पायऱ्या चढताना नौकाराला दिसले.

“पिंके, हळूच ये. पायऱ्या ओल्या आहेत पाय घरून पडशील. नाहीतर थांब, मी तुझा हात धरतॊ. घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या सोबत?” तो मुलगा अगदी मोठ्या माणसासारखा आपल्या बहिणीला जपत होता. नौकरास त्या पोराचे, मोठे कौतुक वाटले. एक, एक पायरी करत ती चिमुकली, गोबऱ्या गालाची बहीण आणि त्या ‘दादा’ ने दुकानात प्रवेश केला.

“कोणतं खेळणं तुला आवडलं होत?” दादाने विचारले. त्या छकुलीने काचेच्या कपाटातील एका बाहुलीकडे बोट दाखवले. नौकर त्यांच्या मागेच उभा होता. ती निरागस भावंडं त्याला भावली होती. आधीच लहानपण गोंडस असत. त्यात बहीण-भावाचं नातं अमूल्य! कपड्यावरून पोर गरिबाघरचीच वाटत होती.

नौकराने तत्परतेने ती बाहुली काढून, गोबऱ्या गालाच्या हातात दिली. कौतुक, आश्चर्य आणि आनंद तिच्या टपोऱ्या डोळ्यात मावत नव्हता!

“काका, मी हि डॉल, माझ्या बहिणी साठी विकत घेऊ शकतो का?” गंभीर चेहरा करून दादाने विचारले.

“हो! घेऊ शकता!”

“काय किंमत आहे? फार महाग नाही ना?”

“नाही! नाही! आणि छोट्या ताईसाठी काहीच महाग नसत. नाही का?”

“ते तर आहेच. किंमत नाही सांगितलीत.”

“तुम्ही किती देऊ शकता?”

दादा गहन विचारात पडला, पण क्षणभरच. त्याने चड्डीच्या खिशात हात घातला. खिशातून झाकली मूठ हलकेच बाहेर काढली. जणू अत्यंत मौल्यवान वस्तू तो काढत होता. त्याने आपली मूठ त्या नौकराच्या ओंजळीत रिकामी केली. ते दहाबारा छोटे शंख-शिंपले होते! त्यानेही, ते जणू पैसे आहेत अश्या आविर्भावात मोजायला घेतले.

“पुरतील ना इतके? का कमी पडतात? माझ्या कडे इतकेच आहेत!” दादाच्या सुरत काळजी होती.

“पुरतील? नाही! हे ज्यास्तच आहेत! हे सहा परत घ्या. डॉल साठी चारच पुरतील!”

ते सहा शिंपले खिशात घालून ती भावंडे पायऱ्या उतरून जाताना, मालक जेवण करून परतले.

“डॉल, विकलीस वाटत! पोरांनी पैसे दिले, का रे? लहान दिसताहेत म्हणून विचारतो.”

“हो. त्यांनी त्या डॉलची किंमत चुकवली आहे, मालक! हे घ्या!” त्याने चार शिंपले मालकाच्या हातावर ठेवले.

“वेडा समजतोस? शंभर रुपयाची डॉल, चार शिंपल्यात विकलीस?”

“मालक! लहान पोर होती. त्यांना पैसा आणि त्याची किंमत काय कळणार? त्या पोराने आपल्या लहान बहिणीसाठी, तिला आवडलेली डॉल घेऊन दिली हे महत्वाचे! त्याच्या साठी हे शिंपले म्हणजे सगळ्यात मौल्यवान वस्तू! ती खिशातून काढताना, तुम्ही पहायला हवे होते!”

मालकाने कपाळावर हात मारून घेतला.

“असे करून तु काय मिळवलंस माहित नाही. माझं मात्र नुकसान केलंस!”

“तुमचे झालेले नुकसान, तुम्ही माझ्या पगारातून शंभर रुपयाचा लचका तोडून भरून काढलं. आता प्रश्न राहिला तो मी काय मिळवलं? तर ते सांगतो. हा मुलगा उद्या मोठे होईल. त्याला पैशाची किंमत कळायला लागेल. तेव्हा त्याला पैशाच्या ऐवजी शिंपले देऊन डॉल घेतल्याचे आठवेल. मग त्याला मी आठवेन. जगात खूप चांगली माणसे आहेत, यावर त्याचा विश्वास बसेल. त्यातुन आपणही चांगले व्हावे याची प्रेरणा त्याला मिळेल. हि चांगुलपणाची, इतरांना मदत करण्याची प्रेरणा आपल्या समाजासाठी खूप महत्वाची असते. प्रत्यक माणूस हा एक शक्तीचा स्रोत असतो. या शक्ती द्वारे चांगले पेरा कि वाईट, ते समाजात भिनत जाते.  या गोष्टीवर माझा विश्वास आहे. मी आज एक चांगुलपणाचे बी लावलंय असे, तुम्हाला नाही असे वाटत?”

मालक त्या नौकराच्या तोंडाकडे पहातच राहिला. तुम्हाला पटतंय या नौकराचे तत्वज्ञान?

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

(मूळ कल्पना नेट वरून.)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..