अडखळू नकोस सखे
बोल जे आहे मनात
नको संकोच होउदे संवाद
का घुसमटून श्वास कोंडतात?
नकोसे म्हणावे नको
हवे तेचं घ्यावे पदरात
मोह होता, कर स्वीकार
उत्सव होउदे रोजच्या जगण्यात
आकसू नको तू बाईपणाने
ताठ माने चाल जनात
सुसाट सुटुदे भात्यातील तीर
कर्तृत्वाने उजळू दे स्वत्व
येणाजाणारा टोचरा धक्का
बसू नको तू आता सहत
विरोध कर तू थोडातरी
दाव मी आहे चंडिकेची भक्त
सृजन आणि सुंदरता
ही शक्ती आहे तुझ्यात
नको दूषणे या जगण्याला
स्त्रीत्व साजरे होउदे आनंदात!!
— वर्षा कदम.
Leave a Reply