नवीन लेखन...

बाजीप्रभू देशपांडे

एक भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व चांद्रसेनिय कायस्थांचा हा ढाण्यावाघ. साऱ्या महाराष्ट्राला वीररत्न बाजीप्रभू देशपांडे या नावाने परिचित असलेलं नाव अत्यंत वजनदार असलेले नाव.

मुळातच चांद्रसेनीय कायस्थ. अग्निचे ते प्रखर तेज आणि तैलबुद्धी यांची दैवजात देणगी मिळालेला समाज- महाराष्ट्रात ‘सी.के.पी.’ या नावाने ओळखला जाणारा समाज पण भारताच्या इतिहासात अनेक प्रांतात आपल्या बुद्धीचा आणि पराक्रमाचा ठसा उमटविलेला समाज.

इ.स. वी. सनाच्या तिसऱ्या शतकापासून राजकारभारात, राजकारणात, प्रशासनापासून रणांगणावरील पराक्रमात हा समाज अग्रभागी होता. या समाजाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पराक्रमात मरणाला आव्हान देण्याची ताकत आणि बुद्धीत चतुस्त्र किमया करण्याची ताकत त्याच बरोबर स्वामी निष्ठा आणि सत्यासाठी त्यागवृत्ती ही वैशिष्ट्ये एकवटलेली दिसतात.आणि वरील गुणामुळेच राजा शिवछत्रपतीनी या समाजावर विश्वास टाकून उदंड प्रेम केलं. राजांच्या पदरी त्याच्या खाजगी पत्रव्यवहारासाठी त्यांचे चिटणीस म्हणून बाळाजी आवजी चित्रे वावरले या चिटणीस घराण्याच्या निष्ठेला तोड नाही. तिच गोष्ट आबाजी दिघे- कारीचे बाबाजी नरसप्रभू गुप्ते आणि मुरारबाजी देशपांडे या साऱ्या मंडळींनी राजांच्या वरील प्रेमाने, निष्ठेने शिवाजी राजाना मोलाचे सहाय्य केले.

मुरारबाजी देशपांडे हे मुळचे नायक तसेच बाजीप्रभू हे मुळचे प्रधान. वतनामुळे ही सारी मंडळी देशपांडे बनली.

बाजीप्रभूंच्या वंशावळीत रामप्रभू – वैज्यप्रभू-पिलाजी प्रभू आणि बाजींचे वडील कृष्णाजी प्रभू ही जणू काही एक पराक्रमाची पालिकाच होय.

वैज्य प्रभूना कासिम बेरीज शहाच्या काळात हिरडस मावळात, रोहिड खोऱ्यात देशपांडे वतनाची ५३ गावे मिळाली आणि तेव्हा पासून या प्रधानांचे देशपांडे झाले आणि इतिहासात या प्रधानांनी देशपांडे नाव अजरामर करुन टाकलं.

याच देशपांड्याच्यात बाजीप्रभू या नावानं शिवशाहीच्या इतिहासाला झळाली दिली.

शिवशाहीच्या तेजस्वी इतिहासात बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःच्या जीवनाचा गजापूरच्या खिंडीत घोडखिंडीत होमकुंड पेटवून स्वतःच्या प्राणाची समिधा टाकून इदम न् मम शिवाय स्वाहा करुन त्यागाची परिसिमा गाठली. हिंदवी स्वराज्यासाठी त्याग, स्वतःच्या राजासाठी त्याग, सनातन वैदिक धर्माच्या रक्षणासाठी त्याग करुन ध्रुवताऱ्याप्रमाणे इतिहासातील आपले नाव अढळ, चिरंतन शाश्वत करुन ठेवले आहे. बाजीप्रभू हे अनेक प्रकारची शस्त्रे आणि अस्त्रे सहज चालवित असत.

दोन्ही हातात पट्टे चढवून विद्युल्लतेच्या चापल्याने रणांगणात लढावे ते बाजीनीच अचूक भालाफेक करुन शत्रूच्या छातीचा वेध घेऊन, छातीच्या चिरफाळ्या कराव्यात त्या बाजीनीच ‘विटा’ दूर फेकी करणाऱ्या अस्त्राने शत्रूच्या पोटात खुपसून त्याला त्या अस्त्राच्या दांड्यावर उचलून दूर फेकून द्यावे ते बाजीनीच.

याचे प्रत्यंतर गजापूरच्या खिंडीत अवघ्या तीनशे मावळ्यांच्या सहाय्याने चार हजार शत्रूशी झुंज देऊन स्वतःच्या रक्ताने ती खिंड पावन करुन लवलवत्या तृणांकुरांच्या संगतीत आजही बाजीप्रभू किर्ती रुपाने त्या खिंडीत उभे आहेत. उघड्या डोळानी, भक्ती प्रेमाने आणि ओंजळीत फुले घेऊन जमलं तर त्यांना भेटून या.

श्री. भाई ताम्हणे 

मो.नं. : ९८८१२७४३९०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..