बाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे.
मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे पार पाडली.
“या चित्रपटासाठी दागिन्यांची निर्मिती करण्यासाठी बरेच संशोधन करावे लागले. हे अलंकार घडविण्यासाठी आम्ही जुन्या काळातील साचे आणि ठसे वापरले. २०० वर्षाहून जुने अलंकारही वापरले. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांनी कधीच बघितले नसतील असे अनेक मराठी अलंकार बघायला मिळाले.” असे पु. ना.गाडगीळ अॅन्ड सन्सचे श्री अजित गाडगीळ सांगतात.
नेकलेस, कंबरपट्टा, बांगड्या, नथ, कानातके डूल, पैंजण, मंगळसूत्रे, नाकी, अंगठ्या हे सर्व दागिने बनवण्यासाठी भारतातील विविध प्रदेशांतील कारागिरांची फौज सुमारे एक वर्षभर मेहेनत घेत होती.
या चित्रपटासाठी खास बाजीरावांच्या शिरावील शिरपेच तसेच कडे आणि अंगठ्या बनवण्यात आल्या.
आता हे सर्व दागिने “पु. ना गाडगीळ अॅन्ड सन्स”च्या विविध ठिकाणांच्या दुकानांमध्येही उपलब्ध होतील.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply