बाळ चिमुकले,
गोड हासले,
रांगत आले ,
पायाला धरुनी,
उभे राहिले,
बाळकृष्ण ते,
मला भासले, —
वदनांतून कोवळे,
ध्वनि उमटले,
बोबड्या स्वरांनी,
मज जिंकीयले,
उचलून घेता ,
कसे आनंदले,
हात हलवून ,
मज कुरवाळले,
कोण लहान,
मग वाटले,
कुशीत त्याच्या,
मीच शिरले ,
हलके हलके,
त्याने थोपटले,
गा,—गा कर ,
मज म्हणाले,
निश्चिंत जीव,—!!!
निश्चिंत मन ,—–!!!
मज विश्वरूपदर्शन,
अलगद घडले,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply