आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी अनेकांकडे असतील. माझ्याकडे त्यांची अशी एक आठवण आहे जी कदाचित कोणाकडेही नसेल.. माझ्यासाठी ती अक्षरश: अमूल्य आहे.
माझ्याकडे त्यांनी स्वाक्षरी केलेली एक बॅट आहे..कदाचित त्यांनी स्वाक्षरी केलेली एकमेव बॅट असावी…
काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे… वानखेडे स्टेडियम वर क्रिकेट मॅच चालली होती… खेळ कंटाळवाणा झाल्यामुळे बाहेर रेगाळत होतो… इतक्यात पांढरी गाडी येऊन जवळ थांबली… बाळासाहेब गाडीमधून उतरत होते….. पोलिसांची गाडी मागे होती… बाळासाहेबा पुढे बॅट धरून म्हणालो यावर स्वाक्षरी हवी आहे… त्यांनी त्याच्या खास स्टाईलने चष्म्यातून बघत म्हणाले मग देतो..ते पोलिसांच्या च्या गराड्यात आत निघून गेले..
मी पण वरच्या मजल्यावर स्टेडियम मध्ये गेलो… तास-दीड तासानंतर खाली गर्दी हलताना दिसली… मी समजलो बाळासाहेब निघाले असणार… तसाच धडपडत खाली आलो… परंतु बाळासाहेब गाडीत बसले होते.. गाडी सुरु झाली होतो मी धावत जाऊन गाडीच्या पुढे गेलो आणि एका झाडाच्या उंचवट्यावर उभे राहून बॅट दाखवली… बाळासाहेबानी गाडी थांबवयाला सागितले…
आणि मला दार उघडून गाडीत यायला सांगितले… मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो… त्याच्या हातात बॅट दिली… ते म्हणाले कुठे करू.. मी म्हणालो संपूर्ण बॅट वर स्वाक्षरी करा… त्यांनी स्वाक्षरी केली… माझ्याकडे जुना कॅमेरा होता… मी विचारले फोटो काढू ते म्हणाले काढ आणि फोटोसाठी पोज दिली… मी फोटो काढला त्यांना वंदन करून बाहेर आलो… बाहेर सिक्युरिटी माझ्या नावाने बोबलत होती… मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही….
११ वर्षांपूर्वी ज्या जागेवर बाळसाहेबाचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी मी ही बॅट नेली… आणि हा फोटो काढला…. आज मी ती बॅट माझ्या संग्रहात जपून ठेवली आहे…मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो…
सतीश चाफेकर
Leave a Reply