ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त झालीया । दंभ तोचि वाया नागवण ॥२॥
वनवास देवाकारणे एकांत । करावी ही व्रत तपे याग॥३॥
व्रत याग यांसी फळली बहुते । होतीया संचिते गौळियांची ॥४॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होते ॥५॥
होते ते द्यावया आला नारायण । मायबापा ऋण गौळियांचे ॥६॥
गौळियांचे सुख दुर्लभ आणिकां । नाही ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply