कृष्ण हा परिचारी कृष्ण हा व्यवहारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसे तुम्हा गमे । वेळ हा करमे वायाविण ॥२॥
वायाविण तुम्हीं पिटीतां चावटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनिया ॥४॥
याचे सुख तुम्हां कळलियावरि । मग दारोदारी न फिराल ॥५॥
लटिके हे तुम्हां वाटेल खेळणे । एका कृष्णाविणे आवघेचि ॥६॥
अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हांस आणीक बोलिले । मग हे लागले कृष्णध्यान ॥८॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिक ही ॥९॥
आणिक ही तुम्हां येती काकुलती। जवळी इच्छिती क्षण बैसो ॥१०॥
बैसो चला पाहो गोपाळाचे मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जव ऐसी मात दसवंती । तव धरिती चित्ती बाळा ॥१२॥
बाळा एकी घरा घेउनिया जाती । नाही त्या परती तुका म्हणे ॥१३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply