कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाही जया जना । तयासि यातना यम करी ॥२॥
कळला हा देव तयासीच खरा । गाई वत्से घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
ब्रम्हादिका ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावे । तुका म्हणे व्हावें संचित हे ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply