नवीन लेखन...

बालनाट्य उद्याचे (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ५)

पूर्वी (६०-८० दशकात) जाणकार लेखक बालनाट्य लिहीत होते. नंतर (पुढील दोन दशकात)शिक्षक लिहायला लागले. मला असे वाटते की यापुढे बालनाट्य हे मुलांनीच लिहिले पाहिजे. बसविले पाहिजे. मुलं स्वतः चित्र काढतात.मुलं कविता लिहितात मग नाटक का नाही लिहू शकणार? आज बालनाट्य चळवळीत मुलांचा सहभाग किती आहे?

आजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं…

मुलांना काय कळतंय? नाट्यकला मुलांना शिकविल्या शिवाय थोडीच त्यांना कळणार आहे.

नाटक ही कला आहे,हे खरं. पण लहान मुलांसाठी तो एक खेळ आहे.आणि मुलांना कोणताही खेळ स्वतः खेळायला आवडतो. भातुकली जशी मुलं मुलं खेळतात,एन्जॉय करतात.बालनाट्य हा प्रांत तसाच त्यांचा आहे.तो त्यांना देऊन टाकावा… थोडक्यात काय तर, नाटक हा खेळ आहे,हे जर मान्य असेल तर मुलांना तो खेळण्याचे स्वतंत्र द्यावे.मुभा द्यावी.

नाट्यकलेचे शिक्षण शाळेमधून दिले तर हे सहजसाध्य आहे. लेखन, दिग्दर्शन, सादरीकरणात लहान मुलांचा सहभाग ही बालरंगभूमीची गरज आहे. आजपर्यंत बालनाट्यात काय सादर करायचे,ते कसे सादर करायचे,त्याची गोष्ट,त्याचे संवाद,त्याचे सादरीकरण.. हे सगळे मोठ्यांनी ठरविले आहे, ते आता लहानांनी ठरविले पाहिजे. मुलांना मुक्तपणे आविष्कार करू दिला पाहिजे. विषय निवडण्याचे आणि तो त्यांच्याच पद्धतीने, सादर करू देण्याचे स्वातंत्र्य लहान मुलांना दिले पाहिजे, उद्याच्या बालनाट्यात मुले जे काही करतील ते स्वतःच्या मनाने आणि प्रयत्नाने.मोठ्यांची भूमिका ही फक्त प्रेक्षकाची आणि निरीक्षकाची असावी.लहान मुलांचे खेळ आपण जसे दुरून बघतो तसेच…

खेळाच्या मैदानावर मुलांना खेळायला मोकळे सोडतो,तसेच रंगमंचावर त्यांना हवं ते करू देण्याची मोकळीक मिळायलाच हवी.तरच बालनाट्य हे खऱ्या अर्थाने मुलांचे राहील. मुलं त्यात आनंदाने सहभागी होतील. उद्याच्या बालरंगभूमीची माझी ही कल्पना काहीजणांना बालिश वाटली तरीही बालरंगभूमीच्या विकासासाठी ती प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. मी स्वतः यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. खेळ नाट्य नावाने बालनाट्य चा एक नवा अवतार आम्ही विकसित केलेला आहे. सबकुछ मुलं करतात. त्याचे उत्तम रिझल्ट मिळालेले आहेत.

बालरंगभूमीमुळे मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे. बालनाट्य म्हणजे घटकाभरची करमणूक नव्हे तर मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी एक चळवळ आहे.
बालनाट्याची संकल्पना सुधाताई ना अमेरिकेतील बालनाट्य चळवळ पाहून सुचली. तिथे युरोप-अमेरिकेत तेव्हापासूनच (१९५९) बालनाट्यचे महत्व तेथील शिक्षणतज्ञांनी ओळखले होते. बालरंगभूमी वर मोठ्यांची लुडबुड अनेकांना अमान्य होती. बालरंगभूमीबद्दल ५०-५५ वर्षांपूर्वी पाश्चिमान्य बालनाट्य तज्ज्ञांनी पुढील मत व्यक्त केले आहे. ते मला खूप महत्त्वाचे वाटते. उद्याची बालरंगभूमी कशी असावी ह्याबद्दलचा विचार मला त्यात दिसतो.

“Children’s theatre is a land, not a building. It is a land of imagination and emotion, set in the empire of dreams. If we do not realize this, or worse, if we do not want to realize this, because of our own blind adult conceptions, we shall get the wrong sort of theatre and it will not be children’s one, at all. There is danger of its becoming merely the sentimental symbol of those who are no longer young, the show-cage for little dead puppets, directed by us, and not by their own delight.”

— राजू तुलालवार.

टीप: (शालेय शिक्षणात बालनाट्याचा अंतर्भाव,याबद्दल चे विवेचन पुढील लेखात करू.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..