नवीन लेखन...

बंधन…

धावतच गोपीका यशोदेच्या घरात शिरल्या. सर्वांनी एक सुरात कृष्णाच्या लिलांचे वर्णन सुरू केले. कृष्णाने वस्त्र कसे चोरले, कृष्णाने कशी मटकी फोडली, कृष्णाने कसे दही-लोणी चोरून नेले. एक ना अनेक तक्रारी ऐकल्यानंतर यशोदेनेही रागातच कृष्णाचा हात धरून ओढत नेले आणि घरातल्या एका खांबाला दोरीने त्याला बांधून ठेवले. ज्याने जन्मल्याबरोबर कंसाच्या कारागृहातील साखळदंड तोडले, तोच कृष्ण यशोदेने बांधलेल्या साध्या दोरीच्या बंधनात अडकला. आईने बांधलेलं हे बंधन कृष्ण तोडु शकला नाही. अर्थात कृष्ण नंतर राधेच्या निर्व्याज प्रेमाच्या बंधनातही अडकलाच होता म्हणा. प्रेमाच बंधन कोण कसे काय बरे तोडु शकेल. बंधनं ही अशीच असतात दिसत नसली तरी ती मजबुत असतात आणि माणसाला बांधुन ठेवण्या इतकी सक्षम असतात. मजबुत असतात.

दिसणारी बंधनं सहजी तोडता येऊ शकत असतीलही पण न दिसणारी बंधनं कशी तोडणार. अशी कितीतरी अदृश्य बंधनं आपल्या अवती-भोवती तयार झालेली असतात ती तोडु म्हणताही तोडता येत नाहीत. टणक लाकुड सहज पोखरुन काढणारा भुंगा कमलदलाच्या पाकळ्यांच्या बंधनात स्वत:ला कोंडुन घेतो. पाकळ्यांचे बंधन भुंगा तोडु शकत नाही. काही बंधनं अशीच असतात, जी आपल्याला तोडवत नाहीतच मुळी.

लहान मुलांच्या पायात आई करदोड्याचं बंधन घालते, तिची समजुत असते की माझ्या मुलांना करदोड्यामुळे कोणाची नजर लागणार नाही, त्याचे काही वाईट होणार नाही. दोन रुपयाला मिळणाऱ्या करदोड्याला आईच्या प्रेमाचं बळ मिळतं, मुलांनाही आईच्या प्रेमाचं हे बंधन हवहवस वाटू लागतं. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. भाऊ देखील मायेनं बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, रक्षाबंधनाचे कर्तव्य पार पाडतो. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या मदतीला उभा राहतो, मित्रत्वाचे हे बंधन कायम राहते, नात्यांचे बंधन कायम राहते, शेवटपर्यंत. व्यवहारात, व्यापारात विश्वासाचे बंधन निर्माण होतात, त्या बळावर मोठमोठे व्यवहार होत असतात. कोण कुणाची फसगत करत नाही. विश्वासाचे बंधन एकदा बांधले की मग त्याला तडा जाऊ दिला जात नाही. आम्हा भारतीयांची तर परंपराच आहे, अगदी ‘प्राण जाये, पर वचन ना जाये’. या परंपरेला आपण जागतो. घेतलेले बंधन निभावतो. लग्नात अग्निला साक्षी मानुन पती-पत्नी एकमेकांना स्वीकारतात. आयुष्यभर एकत्र राहतात, एकमेकांची सुखदु:खे स्वीकारत, जगतात. त्यांना आयुष्यभर कोणतं बंधन बांधुन ठेवतं…! कोण बांधतं ते.

बंधनाची व्याख्या अधिक व्यापक आणि विस्तृत संजीवनी भाटकर यांनी त्यांच्या कवितेतून केलीय.

भाटकर यांची कविता अशी :

प्रेमास प्रेम द्यावे, तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे
जात-धर्म-नाते न तुटतील कधीही
रक्तास रक्त देऊनी
बांधुनी बंध रेशमाचे
शरीराहुनी निराळी रक्तास औढ झाली
जलाहुनी निराळी पवित्र भावनेचे
न तुटतील कधीही हे बंध रेशमाचे
ठेऊ जपून जीवा, धागा अतूट हाच
रेशम जपून ठेव, हे बंध रेशमाचे

— दिनेश दीक्षित

(२४ ऑक्टोंबर १८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..