आज आदिवासी समाज निरनिराळ्या संकटंचा आणी विकासाच्या भ्रामक संकल्पनातून होणार्या अतिक्रमणाचा सामना करीत आहे.
बस्तर मधील बिजापूर (६५६२ चौ.किमी. ) भागाचा रक्तरन्जीत इतिहास नक्षलग्रस्त असल्याने कोणी काम करण्यास तेथे तयार होत नाहीत. रामायण काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेला हा भाग महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील हा भाग नक्षलवादीचे मुख्य कार्यक्षेत्र असून अबुजमाड जंगलाचा ते आश्रय घेतात, इंद्रावती नदीच्या पात्रामुळे त्यांना गनिमी हल्ले करण्यास भरपूर वाव आहे. अशा भागात प्रमुख जिल्हाअधिकारी तांबोळी, यांच्या तडफदार कामामुळे एक आश्रम शाळा व द्वाखाना चालविला जात आहे स्त्री रोग तज्ञ डॉ,ऐश्वरया रेवडकर, त्यांचे पती डॉ. पवन व संगणक अभियंता कल्याणी राऊत या विभागाचे परिवर्तन करीत आहेत. जीवावर उदार होऊन ते करत असलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.गेल्या दोन वर्षात या दवाखान्याचे अद्यावत हॉस्पिटल मध्ये रुपांतर झालेले आहे. नागुल्न या सर्जनने एका दिवसात ५० नसबंदी शस्त्रक्रिया केल्या, एका ८ वर्षाच्या मुलीचा जन्मता शौच्य व मुत्र मार्ग एक होता, तिच्यावर अतिशय अवघड शस्त्रक्रिया येथे करून तिला जीवदानच दिले.
येथील डॉक्टरना नक्षलवादी वेठीस धरतात,त्यांना जंगलातील आपल्या तळावर जबरदस्तीने नेतात, तेथे उपचार तर करायचेच पण त्या शिवाय हॉस्पिटल मध्ये असलेला औषधसाठा घेऊन जातात. सरकार या कारणामुळे डॉक्टरसं वर कारवाई करतात.आदिवासी स्त्रीयांना खरा दिलासा मिळालेला असून स्त्री विभागाला उमंग नाव दिलेले आहे.
सलवा जुडूम ही एक आदिवासीना शस्त्रे देऊन लढा देण्याची एक सेना उभारली गेली, पण ही योजना पूर्ण पणे फसली, त्याचे प्रणेते होते,के.मधुकर राव जे हातात AK47 RIFLE घेऊन नक्षली बरोबर कडवी झुंज देत होते. नक्षली शरण तर आलेच नाहीत ,पण त्यानी यात सामील झालेल्या आदिवासीना वेचून ठार मारले, राव नशिबानेच वाचले. अजूनही ते नक्षलींच्या हिट लिस्ट वर आहेत.आता राव पंचशील नावाचा अनाथाश्रम चालवीत आहेत.चळवळीत मारल्या गेलेल्या आदिवासींच्या अनाथ मुलामुलींचा ते सांभाळ करतात.आज या मुलांच्या चेहऱ्या वरील निष्पाप भाव,त्यांच्या वागण्यातील अपराधीपण पाहून मन विशिणण होते. तेथे भेटीला गेलेल्या एका वार्ताहराने त्यांना ओरीगामी शिकविले व त्यांच्या कडून अनेक कलाकृती करून घेतल्या , आपण असे स्वत: करू शकतो हे अनुभवताना त्यांचे चेहरे फुलले, पण हे हास्य कायम टिकणार का? कधीच न सुटणारे कोडे आहे.
आदिवासी करता स्वस्त धान्य दुकाने निघाली,दुकानात सुटे पैसे नसल्याने आदिवासींचे ५ ते ७ रुपयांचे नुकसान होते, पण जबाबदार कोण ?
एकदा शाळेतील लहान मुला मुलीना विचारले होते की त्यांना सर्वात कोणाची भीती वाटते ते चिठ्ठीवर लिहा सर्वांनी लिहिले डास कोणीही नक्षली लिहिले नव्हते केवळ भीतीपोटी.
सरकारने लढा देण्यासाठी CRPF ( central reserve police force ) ही भारतातील सर्वात मोठी नीम लष्करी सेना ठेवलेली आहे. त्यांच्या मदतीला DISTRICT RESERVE GUARDS (DRG ) ही नवीन तयार केलेली आक्रमक फौज नक्षली बरोबर लढू शकेल अशा तर्हेने त्याना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्या मध्ये तरुण आदिवासी पुरुष व बायका व शरण आलेले नक्षलवादी सामील करण्यात आलेले आहेत. हे सर्व स्थानिक असल्याने त्यांना या भागातील दुर्गम जागा माहीत आहेत, ते गोंड भाषा बोलत असल्याने गावातील लोकात मिसळू शकतात.लढ्यात ते आक्रमक योद्धे म्हणून निकराचा लढा देतात.
हा संपूर्ण प्रश्नच अतिशय गुंतागुंतीचा आहे, त्यामध्ये निर्णायक विजय मिळविणे सोपे नाही. हा प्रश्न जटील होण्यास आपली व्यवस्था कारणीभूत आहे.,व ती आपणच निर्माण केली आहे,त्यामुळे जबाबदारी आपलीच आहे.गरीब भाबडे आदिवासी या रेट्याखाली भरडले गेलेले आहेत. काळच त्यांचे भविष्य ठरविणार आहे.
अशा दुर्देवी आदिवासींच्या काही सत्यकथा मन पिळवटून टाकणाऱ्या आहेत, त्यातील काही कथा.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply