आमच्या समोर ती नवीन नवरी
म्हणून रहाण्यास आली
असेल मी ८ ते १० वर्षाचा.
त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हते .
आम्ही मुले-मुली खेळत असू.
त्यावेळी अनेक घरांखाली
बांगड्यांच्या काचांचे तुकडे मिळत.
चाळीतली घरे असत.
आम्ही मुले-मुली लहान
वात लावून पणती लावत असू
आणि सगळे त्याआधी बांगड्यांच्या
काचा गोळा करत असू.
मग त्या काचेची एक टोक गरम करून
दुसरीला चिकटवायचे
मग हळू हळू रंगीबेरंगी माळ तयार होत असे.
दोन रंग नेहमी जास्त असत .
हिरवा आणि लाल
पण नवीन नवरी आली की
हिरव्या बांगड्याचे तुकडे
त्यांच्या खिडकीखाली जास्त मिळत.
त्या बांगड्या तुटतात कशा हे आम्हा मुलांना
कोडे होते.
ती समोरची नवी नवरी अली होती.
सगळे अत्यंत धार्मिक वगैरे असत त्यावेळी सगळे .
तिचा हात नवीन बागड्यानी छान दिसत असे.
हळू हळू त्या बांगड्यांचे तुकडे
त्यांच्या खिडकीखाली मिळत असत.
त्या बांगड्या तुटतात का..
जसजसा मोठा होऊ लागलो तो
माळा करण्याचा उपदव्याप तात्पुरता असतो
तो कधीच बंद झाला होता.
काल ती समोरची काकू अचानक गेली.
तिला बाहेर आणले नवीन साडी नेसून
डोक्याला कुंकू , तिच्या हातात हिरव्या बांगड्या
घालता येत नव्हता म्ह्णून तिच्या डोक्याशी ठेवल्या.
तेव्हा मला ती जेव्हा लग्न होउन घरी आलीं
तेव्हा त्यांच्या घराच्या खिडकीखाली त्या
बागड्या आम्ही गोळा करत असू.हे अचानक आठवले.
कुठला विचार कुठे आला काहीच कळत नाही.
मला त्यावेळी मी आईला विचारलेला
प्रश्न आठवला , विचारले होते
त्या नवीन काकूंच्या खिडकीखाली
जास्त बांगड्यांचे तुकडे का मिळतात.
आईने कानफटावयाचे बाकी ठेवले होती
ती सरळ शिव्याच देत असे…
ती शिवी हासडून म्हणाली
तुला मेल्या कशाला चौकशा नसत्या, अभ्यास कर.
तरी पण त्या बांगड्या तुटतात का हा निरुत्तर
करणारा प्रश्न होताच.
हा प्रश्न आमच्या इथल्या एका काकांना विचारला
ते बऱ्यापैकी इरसाल होते
तेव्हा त्यांनी एक डोळा बारीक करून म्हटले होते
येड्या त्या तुटत नाहीत ..
त्या वाढवतात्त..
कशा .. मी म्हणालो..
तेव्हा ते म्हणाले तू लहान आहेस
पुढे कळेल ..
यथवकास कळले
तो .’ विषय ‘ खरा डोक्यातून गेला होता.
आता तो प्रसंग ह्या वेळीच आठवावा…!
काकू आज गेल्या….
चार मुलगे आणि तीन मुली मागे ठेवून …..
सतीश चाफेकर
Leave a Reply